अ‍ॅपशहर

५ कॅमेऱ्याचा पोको M2 Pro भारतात लाँच, पाहा किंमत

भारतात नवीन स्मार्टफोन Poco M2 Pro लाँच करण्यात आला आहे. या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपयांपासून १६ हजार ९९९ रुपयांपर्यंत आहे. या फोनची विक्री येत्या १४ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jul 2020, 7:30 pm
नवी दिल्लीः स्मार्टफोन ब्रँड पोको (Poco) ने भारतात नवीन स्मार्टफोन Poco M2 Pro लाँच केला आहे. १४ हजारांपेक्षा कमी किंमत असलेल्या या फोनमध्ये चार रियर कॅमेरा आणि पंच होल कॅमेरा डिस्प्ले दिला आहे. तसेच या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि ३३ वॅट फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. शाओमीपासून वेगळे होऊन स्वतंत्र ब्रँड बनलेल्या पोकोचा भारतात हा तिसरा स्मार्टफोन आहे. फोनची १४ जुलैपासून फ्लिपकार्टवर विक्री होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Poco M2 Pro


वाचाः गुड न्यूज! BSNL देतेय फ्री 5GB डेटा, 'असा' घ्या फायदा

फोनची किंमत
पोको एम२ प्रो स्मार्टफोन तीन व्हेरियंटमध्ये येतो. 4GB + 64GB मॉडलची किंमत १३ हजार ९९९ रुपये, 6GB + 64GB मॉडलची किंमत १४ हजार ९९९ रुपये, आणि 6GB + 128GB मॉडलची किंमत १६ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोन तीन रंगात म्हणजेच ब्लू, ग्रीन आणि ब्लॅक या रंगात उपलब्ध आहे.

वाचाः WhatsApp ची ही नवी सुविधा माहित आहे का?


४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा
स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियरमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल सेंसर, ५ मेगापिक्सलचा सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. कॅमेरा अॅप मध्ये प्रो कलर मोड, प्रो व्हिडिओ मोड आणि रॉ मोड मिळतो. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा इन स्क्रीन फ्रंट कॅमेरा दिला आहे. फ्रंट कॅमेऱ्यात नाईड मोड देण्यात आला आहे.

वाचाः Airtel ची खास सर्विस, या युजर्संना मिळणार सर्वात वेगवान 4G इंटरनेट स्पीड




फोनचे अन्य खास वैशिष्ट्ये

पोको एम२ प्रो मध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. जो फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन (1080x2400 पिक्सल) सोबत येतो. फोनला प्रोटेक्शनसाठी यात फ्रंट, रियर आणि कॅमेऱ्यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ५ मिळतो. अँड्रॉयड १० वर काम करणाऱ्या या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर दिला आहे. फोन अनलॉक करण्यासाठी साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि एआय फेस अनलॉक फीचर दिले आहे.

वाचाः रियलमी नार्जोच्या या फोनचा आज सेल, ऑफर्स मिळणार

वाचाः रेडमी नोट ९ प्रोचा आज पुन्हा सेल, पाहा ऑफर्स

वाचाः पोको M2 Pro आज भारतात लाँच होणार, जाणून घ्या डिटेल्स

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज