अ‍ॅपशहर

रियलमी नार्जो 10A भारतात लाँच, पाहा किंमत

चीनची स्मार्टफोन कंपनी रियलमीने आपले दोन स्मार्टफोन भारतीय बाजारात आज दुपारी लाँच केले आहेत. हे दोन्ही फोन बजेटमधील स्मार्टफोन असून या फोनची विक्री येत्या २२ मे पासून भारतात सुरू करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 May 2020, 3:50 pm
नवी दिल्लीः रियलमीने लॉकडाऊनमध्ये भारतात आपला बजेटमधील स्मार्टफोन रियलमी नार्जो १०ए लाँच केला आहे. तसेच रियलमी नार्जो १० सुद्धा लाँच केला आहे. रियलमीची नार्जो १० सीरिज ही बजेटमधील सीरिज असून या फोनची किंमत ८ हजार ४९९ रुपये आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम realme narzo 10 and narzo 10a


वाचाः करोनाविरोधात जग 'या' टेक्नोलॉजीचा वापर करतेय

Realme Narzo 10A ची वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ड्युअल सीम सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉयड १० वर आधारीत रियलमी यूआय देण्यात आला आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रिझॉल्यूशन ७२० x १६०० पिक्सल आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग ग्लास ३ चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. फोनमध्ये मीडियाटेक ऑक्टाकोर हेलियो जी७० प्रोसेर मिळणार आहे. फोनमध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. मेमरी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येवू शकतो.

वाचाः National Technology Day: करोना विरोधात लढण्यास तंत्रज्ञानाची मोठी मदत : मोदी

Realme Narzo 10A चा कॅमेरा
या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात एक कॅमेरा १२ मेगापिक्सलचा, दुसरा लेन्स २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि तिसरा २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या कॅमेऱ्यासोबत एआयचा सपोर्ट आहे.

Realme Narzo 10A ची बॅटरी
फोनमध्ये ४जी एलईटी, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, मायक्रो यूएसबी पोर्ट, फिंगरप्रिंट सेन्सर आणि ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Realme Narzo 10A ची किंमत
या फोनची किंमत ८ हजार ४९९ रुपये आहे. हा फोन विक्रीसाठी फ्लिपकार्ट आणि रियलमीची अधिकृत वेबसाइटवरून २२ मे पासू दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. या फोनवर ऑफर्स संबंधी कंपनीकडून अद्याप काही माहिती उपलब्ध झाली नाही.

वाचाः ...तर देशभरात स्वस्तात मिळणार करोना व्हायरसचे औषध

वाचाःलॉकडाऊनः जिओचा नवा 'वर्क फ्रॉम होम' प्लान लाँच

वाचाः लॉकडाऊनमध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च काय केले?

वाचाः 'रेडमी नोट ९ प्रो'च्या जाहीरातीत अणूबॉम्ब; शाओमीची माफी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज