अ‍ॅपशहर

रियलमीच्या या फोनचा आज सेल, ऑफरमध्ये कॅशबॅक-डिस्काउंट मिळणार

तुम्हाला बजेटमधील स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आज रियलमीच्या Realme Narzo 10A चा आज सेल आहे. आज दुपारी १२ वाजता या सेलला सुरुवात होत आहे. या सेलमध्ये या फोन खरेदीवर कॅशबॅक आणि डिस्काउंट मिळणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jul 2020, 11:25 am
नवी दिल्लीः रियलमीचा बजेट स्मार्टफोन Realme Narzo 10A चा आज सेल आहे. आज दुपारी १२ वाजता या सेलला सुरूवात होणार आहे. युजर या फोनला दुपारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट सोबतच रियलमीच्या अधिकृत ऑनलाइन स्टोरवरून खरेदी करु शकतील. या फोनची सुरुवातीची किंमत ८,९९९ रुपये आहे. या फोनवर कॅशबॅक आणि तात्काळ डिस्काउंटचा फायदा मिळणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम realme narzo 10a


वाचाः 48MP क्वॉड कॅमेऱ्याचा फोन झाला स्वस्त, पाहा किंमत

या ऑफर्स मिळणार
रियलमी नार्जो १०ए दोन व्हेरियंटमध्ये येतो. या फोनचा ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ८ हजार ९९९ रुपये आणि ४ जीबी प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे.ब्लू आणि व्हाईट कलरच्या ऑप्शनमध्ये या फोनला खरेदी करता येवू शकते. या फोनवर ५ टक्के कॅशबॅक मिळेल. कॅशबॅकसाठी युजर्सला फ्लिपकार्ट अॅक्सेस बँक क्रेडिट कार्डवरून शॉपिंग करावी लागेल.

वाचाः OnePlus ने भारतात लाँच केली स्वस्त टीव्ही सीरिज, किंमत १२,९९९ ₹


जर तुम्ही अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास तुम्हाला १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळेल. फ्लिपकार्टवरून फोन खरेदी केल्यास नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय उपलब्ध आहे. फोनला रियलमीच्या साईटवरून या फोनला आकर्षक एक्सचेंज्ड ऑफरमध्ये खरेदी करता येवू शकते.

रियलमी नार्जो १०ए चे खास वैशिष्ट्ये

रियलमी नार्जो १०ए अँड्रॉयड १० वर बेस्ड Realme UI सोबत येतो. मीडियाटेक हीलियो G70 एसओसी प्रोसेसर देण्यात आला आहे. ६.५ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720x1600 पिक्सल आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेर्याचा सेटअप दिला आहे. यात १२ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेचा फोन मध्ये ५ मेगापिक्सलाचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाचाः Whatsapp मध्ये आले अनेक नवीन फीचर, जाणून घ्या डिटेल्स


फोनला पॉवर देण्यासाठी यात स्टँडर्ड चार्जिंग सपोर्ट सोबत 5000mAh ची बॅटरी दिली आहे.फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ वर्जन 5.0, जीपीएस/A-जीपीएस आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

वाचाः रियलमीच्या या फोनचा भारतात बंपर सेल, ३ लाखांहून अधिक फोनची विक्री

वाचाः देसी TikTok 'चिंगारी'ची वेबसाईट हॅक, कंपनी म्हणतेय....

वाचाः वनप्लसच्या फोनचा आज सेल, ७ हजार रुपयांपर्यंत फायदा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज