अ‍ॅपशहर

शाओमी 'रेडमी K20 Pro' स्मार्टफोन बंद करणार

शाओमी (Xiaomi) ने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये धक्कातंत्र वापरल्याने अनेक जण संभ्रमावस्थेत आहेत. कंपनीने केवळ Redmi K30 फोन लाँच केला. कारण, Redmi K30 Pro फोन लाँच होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. परंतु, कंपनीने एकच फोन लाँच केला. त्यामुळे शाओमीचा Redmi K20 Pro या फोनचे उत्पादन बंद केले जाणार असल्याची घोषणा शाओमीचे उपाध्यक्ष आणि रेडमी ब्रँडचे जनरल मॅनेजर लू विबिंग यांनी केली आहे. या फोनला लाँच करून वर्ष उलटत नाही तोच कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Feb 2020, 12:41 pm
नवी दिल्लीः शाओमी (Xiaomi) ने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये धक्कातंत्र वापरल्याने अनेक जण संभ्रमावस्थेत आहेत. कंपनीने केवळ Redmi K30 फोन लाँच केला. कारण, Redmi K30 Pro फोन लाँच होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. परंतु, कंपनीने एकच फोन लाँच केला. त्यामुळे शाओमीचा Redmi K20 Pro या फोनचे उत्पादन बंद केले जाणार असल्याची घोषणा शाओमीचे उपाध्यक्ष आणि रेडमी ब्रँडचे जनरल मॅनेजर लू विबिंग यांनी केली आहे. या फोनला लाँच करून वर्ष उलटत नाही तोच कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Redmi K20 Pro


लू विबिंगने आपल्या विबो पोस्टमध्ये सांगितलेय की, जगभरात Redmi K20 Pro चे ५० लाख हून अधिक जास्त युनिट उपलब्ध करण्यात आलेले आहे. परंतु, फेब्रुवारी २०२० मध्ये या फोनचे उत्पादन बंद करण्यात येणार आहे. रेडमी के२० प्रो ला गेल्यावर्षी मे महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. म्हणजेच फोनला वर्ष पूर्ण होण्यास अजून तीन महिने बाकी आहेत. विशेष म्हणजे, लू विबिंग यांनी आपल्या पोस्टमध्ये हे स्पष्ट केले नाही की, रेडमी के २० प्रो हा फोन केवळ चीनमधून हटवण्याचा निर्णय घेतला आहे की, भारतातूनही हा फोन बाद करण्यात येणार आहे. यासंबंधी Xiaomi India ला विचारले असता शाओमीच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, रेडमी के२० सीरिज चे फोन भारतात सध्या तरी विकले जातील. कारण, भारतात रेडमीची नंबर वन सीरिज आहे.

रेडमी के२० प्रो चे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला म्हणजे कंपनी लवकरच रेडमी के३० प्रो लाँच करण्याच्या तयारीत आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. एका रिपोर्टनुसार, शाओमी आपला रेडमी के30 प्रो ला मार्च महिन्यात लाँच करू शकते. गीकबेंच लिस्टिंगच्या माहितीनुसार, रेडमी के३० प्रो मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम असणार आहे. रेडमीच्या या फोनमध्ये चार रियर कॅमेरे असणार असून त्यातील एक ६४ मेगापिक्सलचा Sony IMX686 सेन्सर देण्यात येणार आहे.

स्वस्त 'आयफोन' मार्चमध्ये; जाणून घ्या किंमत

भारतीय तरुणांमध्ये इंटरनेट उपवासाचा ट्रेंड

१० हजारांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट स्मार्टफोन

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज