अ‍ॅपशहर

रेडमीच्या 'या' फोनची लाँचिंग ८ जानेवारीला, लाँचआधीच फोटो-फीचर्स लीक

चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी शाओमीची सब ब्रँड कंपनी रेडमी आपला नवीन स्मार्टफोन ८ जानेवारी रोजी लाँच करणार आहे. परंतु, या फोनच्या लाँचिंग आधीच काही फीचर्स व फोटो लीक झाले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jan 2021, 4:42 pm
नवी दिल्लीः Xiaomi Redmi Note 9T 5G स्मार्टफोन ८ जानेवारी रोजी लाँच करण्यात येणार आहे. लाँच आधीच जर्मनीची वेबसाइटवर हँडसेटची लिस्टिंग पाहिली गेली आहे. लिस्टिंगवरून या फोनचे खास वैशिष्ट्ये आणि फोटो लीक झाली आहे. आता लिस्टिंगला अॅक्सेस दिला नाही. कारण, याला साइटवरून हटवले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Redmi Note 9T 5G


वाचाः Nokia 5.3 च्या किंमतीत कपात, पाहा नवी किंमत

रेडमी नोट 9T 5G ची अॅमेझॉनवर दिसलेल्या फोटोला एका टिप्स्टरने अॅमेझॉन लिस्टिंगला डिलिट करण्याआधी डाउनलोड केलेले आहे. रेडमी नोट ९ टी ५ जी ला ब्लॅक आणि वॉयलट कलर्समध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. रेडमी नोट 9T 5G च्या फोटोवरून हे उघड झाले आहे की, फोनमध्ये पंचहोल डिस्प्ले आणि बाजुला फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाणार आहे. फोनच्या बॅक पॅनेलवर एक राउंड शेप कॅमेरा मॉड्यूल दिला जाणार आहे. हँडसेटच्या रियर वर एक एलईडी फ्लॅश दिला जाणार आहे.

वाचाः फ्लिपकार्टवर ५ ते ९ जानेवारीपर्यंत सेल, 'या' स्मार्टफोन्सवर 'बंपर डिस्काउंट'

रेडमी नोट 9T 5G स्मार्टफोनची वैशिष्ट्ये
रेडमी नोट 9T 5G च्या या स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. स्क्रीन फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन 1080 x 2340 पिक्सल सपोर्ट करते. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. हँडसेटमध्ये ड्यूल स्पीकर्स दिले आहेत.

वाचाः Realme Watch S Pro ला आज खरेदीची संधी, जाणून घ्या ऑफर्स

या फोनमध्ये डायमेंसिटी ८०० यू चिपसेट दिला आहे. फोनमध्ये LPPRDR4x रॅम व UFS 2.2 स्टोरेज दिला आहे. स्टोरेजला वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट दिला आहे. फोनला १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 5000mAh बॅटरी दिली आहे. यात एनएफसी कनेक्टिविटी दिली आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये रियरवर ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि २ मेगापिक्सलचा सेन्सरचा ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. या फोनच्या किंमती संदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

वाचाः WhatsApp मध्ये यावर्षी येताहेत 'हे' जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या डिटेल्स

वाचाः शाओमीचा Mi 10i 5G स्मार्टफोन आज भारतात लाँच होणार, जाणून घ्या डिटेल्स

वाचाः WhatsApp युजर्संसाठी जबरदस्त ट्रिक, मित्र-मैत्रिणींचे स्टेट्स व्हिडिओ 'असे' सेव्ह करा

वाचाः जिओच्या या पॅकमध्ये २५२ जीबीपर्यंत डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री ऑफर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज