अ‍ॅपशहर

जिओचा स्वस्त रिचार्ज प्लान, रोज 3GB डेटा आणि कॉलिंग

सर्वात मोठी खासगी कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी दररोज ३ जीबी डेटा देणारा एक रिचार्ज प्लान आणला आहे. या प्लानची किंमत ३४९ रुपये आहे. जाणून घ्या प्लानमध्ये युजर्संना काय-काय मिळतेय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jul 2020, 4:14 pm
नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या युजर्संना रोज ३ जीबी डेटा देणारे अनेक प्लान आणले आहेत. परंतु, आज आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त प्लानसंबंधी माहिती देत आहोत. याची किंमत ३४९ रुपये आहे. व्होडाफोन आणि एअरटेलच्या तुलनेत कंपनी जास्त डेटा ऑफर करीत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम reliance jio


वाचाः रियलमीच्या या फोनचा भारतात बंपर सेल, ३ लाखांहून अधिक फोनची विक्री

रिलायन्स जिओचा ३४९ रुपयांचा प्लान
रोज ३ जीबी डेटाची सुविधा देणारा प्रीपेड प्लान आहे. प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. या प्रमाणे ग्राहकांना एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. कॉलिंगमध्ये ग्राहकांना जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तर अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी १००० नॉन जिओ मिनिट्सची सुविधा दिली जाते. तसेच युजर्संना रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

वाचाः देसी TikTok 'चिंगारी'ची वेबसाईट हॅक, कंपनी म्हणतेय....


व्होडाफोनचा २९९ रुपयांचा प्लान
२८ दिवसांची वैधता असलेला व्होडाफोनचा २९९ रुपयांचा प्लान ऑफर करीत आहे. हा रोज २ जीबी डेटा देणारा प्लान आहे. कंपनी डबल डेटा ऑफर अंतर्गत ग्राहकांना रोज ४ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच रोज १०० एसएमएस आणि व्होडाफोन प्ले आणि झी५ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते.

वाचाः वनप्लसच्या फोनचा आज सेल, ७ हजार रुपयांपर्यंत फायदा


एअरटेलचा ३४९ रुपयांचा प्लान
एअरटेलच्या या प्लानची वैधता सुद्धा २८ दिवसांची आहे. यात रोज २ जीबी डेटा दिला जातो. तसेच युजर्संना ५६ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच रोज १०० एसएमएस आणि अॅमेझॉन प्राईमचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते.

वाचाः ओप्पोचा Reno 3 Pro दोन हजारांनी स्वस्त, पाहा नवी किंमत

वाचाः चायनीज फोनसंबंधी आली मोठी न्यूज, जाणून घ्या डिटेल्स

वाचाः फेसबुकचा पासवर्ड तात्काळ बदला, या २५ अॅप्सपासून मोठा धोका

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज