अ‍ॅपशहर

Jio, Airtel, Vi आणि BSNL: लाँग टर्मचे बेस्ट प्रीपेड प्लान

देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड, सर्वात मोठी खासगी कंपनी रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाचे जर तुम्ही ग्राहक असाल तर तुमच्यासाठी लाँग टर्मचे बेस्ट प्लानसंबंधी या ठिकाणी माहिती देत आहोत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2020, 6:13 pm
नवी दिल्लीः रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन-आयडिया आणि बीएसएनएल देशातील टॉप टेलिकॉम कंपन्या आहेत. या कंपन्यांनी आपल्या युजर्संच्या गरजेनुसार, वेगवेगळ्या वैधतेचे प्रीपेड प्लान आणले आहेत. अनेक युजर्स लाँग टर्म प्रीपेड पॅकसाठी आग्रही असतात कारण त्यांना वारंवार रिचार्ज करणे कठीण काम वाटते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी Jio, Airtel, Vi आणि BSNL च्या अशाच लाँग टर्म प्लानसंबंधी माहिती देणार आहोत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम long-term best prepaid plan


वाचाः Whatsapp वर २०२० मध्ये आले हे टॉप ५ फीचर्स, तुम्ही ट्राय केलेत का?

रिलायन्स जिओचा २५९९ रुपयांचा प्रीपेड प्लान
रिलायन्स जिओकडे अनेक लाँग टर्म प्लान उपलब्ध आहेत. २५९९ रुपयांचा पॅक सर्वात चांगला प्लान आहे. या पॅकमध्ये कंपनी रोज २ जीबी डेटा शिवाय १० जीबी बोनस डेटा ऑफर करते. या प्लानमध्ये जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तर नॉन जिओ नेटवर्कवर १२ हजार एफयूपी मिनिट्स मिळतात. ग्राहकांना रोज १०० एसएमएस मिळते. तसेच जिओ अॅप्स आणि डिज्नी हॉटस्टार व्हीआयपीची एक वर्षापर्यंत मेंबरशीप फ्रीमध्ये मिळते. जिओचा हा प्लान ३६५ दिवस म्हणजेच वर्षभराच्या वैधतेसोबत येतो.

वाचाः रेडमीचा हा स्मार्टफोन झाला महाग, जाणून घ्या नवीन किंमत

एअरटेलचा २६९८ रुपयांचा प्रीपेड प्लान
एअरटेलकडे २६९८ रुपयांचा लाँग टर्म प्लान आहे. याची वैधता ३६५ दिवसांची आहे. या पॅकमध्ये रोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय, जिओ पॅकमध्ये १०० एसएमएस रोज व डिज्नी प्लस हॉटस्टारचे एक वर्षापर्यंतचे सब्सक्रिप्शन फ्री दिले जाते. तसेच ग्राहकांना एअरटेल थँक्सचे बेनिफिट्स या प्लानमध्ये मिळते.

वाचाः Airtel ग्राहकांना फ्री मध्ये मिळतोय 5GB डेटा, डाउनलोड करा Airtel Thanks App

वोडाफोन-आयडियाचा २५९५ रुपयांचा प्लान
वोडाफोन-आयडियाचा लाँग टर्म प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. या पॅकमध्ये २ जीबी डेली डेटा दिला जातो. याशिवाय, अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, आणि १०० एसएमएस दिले जाते. ग्राहकांना Zee5 प्रीमियम आणि Vi Movies & TV चे एक वर्षापर्यंत सब्सक्रिप्शन मिळते.

वाचाः जिओचे रोज ३ जीबी डेटाचे प्लान, ८४ दिवसांच्या वैधतेसह हे बेनिफिट्स, जाणून घ्या किंमत

BSNL चा १९९९ रुपयांचा प्लान
१९९९ रुपयांचा प्लानची वैधता ४२५ दिवसांची आहे. म्हणजेच या प्लानची वैधता सर्व कंपन्यांपेक्षा जास्त आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग (रोज २५० मिनिट) ऑफर करते. तसेच रोज ३ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळते. युजर्संना Eros Now आणि Lokdhum कॉन्टेन्ट चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

वाचाः प्रतिक्षा संपली! या तारखेला भारतात रिलाँच होऊ शकतो पबजी मोबाइल

वाचाः शाओमी ब्लॅक फ्रायडे सेलला सुरुवात, मोबाइलसह प्रोडक्ट्सवर बंपर सूट

वाचाः मस्तच! WhatsApp वर आता मेसेज शेड्यूल करा, या सोप्या टिप्स पाहा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज