अ‍ॅपशहर

रिलायन्स जिओचा दिवाळी धमाका!; बंपर ऑफर

ग्राहकांना मोफत इंटरनेट डेटा देऊन टेलिकॉम क्षेत्रात धम्माल उडवून देणाऱ्या रिलायन्स जिओने या दिवाळीला जोरदार धमाका करून प्रतिस्पर्धी कंपन्यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. जिओ टेलिकॉमने दिवाळीनिमित्त 'जिओ दिवाली धना धन' ऑफर जाहीर केली आहे.

Maharashtra Times 12 Oct 2017, 12:00 pm
मटा ऑनलाइन वृत्त
महाराष्ट्र टाइम्स.कॉम reliance jio diwali dhana dhan reliance company unleashes a brand new price war today
रिलायन्स जिओचा दिवाळी धमाका!; बंपर ऑफर


ग्राहकांना मोफत इंटरनेट डेटा देऊन टेलिकॉम क्षेत्रात धम्माल उडवून देणाऱ्या रिलायन्स जिओने या दिवाळीला जोरदार धमाका करून प्रतिस्पर्धी कंपन्यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. जिओ टेलिकॉमने दिवाळीनिमित्त 'जिओ दिवाली धना धन' ऑफर जाहीर केली आहे. त्यानुसार ३९९ रुपयांच्या प्लानवर फुल कॅशबॅक दिले जाणार आहे. या बंपर ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रिपेड सिमकार्ड ग्राहकांना १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान ३९९ रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. हा प्लान १९ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

जिओकडून ३९९ रुपयांच्या प्रिपेड रिचार्जवर १०० टक्के कॅशबॅक देण्यात येत आहे. रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना जिओ अॅपमध्ये ५० रुपयांचे ८ व्हाउचर मिळतील. म्हणजेच ३९९ रुपयांच्या रिचार्जवर ४०० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. या व्हाउचरचा उपयोग ३०९ रुपयांहून अधिकच्या रिचार्जवर एकेक करून करता येईल. एखाद्या ग्राहकाला डेटा अॅड ऑन रिचार्जसाठी वापरायचा असल्यास त्याला ९९ रुपयांहून अधिकच्या डेटा अॅड-ऑनचा पर्याय निवडावा लागेल. हे सर्व व्हाउचर १५ नोव्हेंबरपर्यंत वापरता येतील.

'जिओ दिवाली धना धन' ऑफरनुसार जिओची वेबसाइट, जिओ अॅप, रिलायन्स डिजिटल आणि जिओ स्टोअरद्वारे ३९९ रुपयांचा रिचार्ज करू शकतील. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असेल. हा अॅडव्हान्स रिचार्ज असेल आणि तो सध्याच्या प्लानची मुदत संपल्यानंतर लागू होईल. ३९९ रुपयांत तीन महिन्यांचा ऑल अनलिमिटेड प्लान ग्राहकांना मिळेल. त्यात मोफत व्हाइस कॉलिंग, मोफत एसएमएस, रोमिंग आणि एसटीडी सेवा असणार आहे. दररोज १ जीबी डेटा वापरता येईल. १ जीबी डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होईल, पण डेटा अनलिमिटेड असणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज