अ‍ॅपशहर

जिओचे ४०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे दोन प्लान, ८४ GB डेटा मिळणार

देशातील सर्वात मोठी खासगी कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच जबरदस्त प्लान आणत असते. जिओचे दोन नवीन प्लान मस्त आहेत. यात युजर्संना ८४ जीबी पर्यंत डेटा दिला जातो.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Aug 2020, 7:18 pm
नवी दिल्लीः रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमतीचे अनेक प्लान ऑफर करते. अनेक ग्राहकांना जास्त डेटा असलेले प्लान हवे असतात. काही ग्राहकांना मोठी वैधता असलेले प्लान हवे असतात. या ठिकाणी आम्ही तुम्हाला ४०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लानसंबंधी माहिती देत आहोत. ज्यात ८४ जीबीचा डेटा मिळतो. या दोन प्लानपैकी एका प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटाचा आहे. तर दुसरा प्लान हा दुप्पट वैधता असलेला प्ला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम reliance jio


वाचाः ६ ऑगस्टपासून अॅमेझॉन प्राईम डे सेल, सामान खरेदी करण्याच्या टीप्स

रिलायन्स जिओचा ३९९ रुपयांचा प्लान
रिलायन्स जिओच्या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा चा प्रीपेड प्लान आहे. ३९९ रुपयांच्या या प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधता आहे. या प्रमाणे ग्राहकांना एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. युजर्संना जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी २०० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

वाचाः नोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत ₹ ७५००


रिलायन्स जिओचा ३४९ रुपयांचा प्लान
जिओच्या ३४९ रुपयांच्या प्लानमध्ये केवळ २८ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा दिला जातो. या प्रमाणे युजर्संना ८४ जीबी डेटा दिला जातो. यात युजर्संना जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी १ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

वाचाः ड्यूल सेल्फी कॅमेऱ्याचा Vivo S7 लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स


कोणता प्लान बेस्ट
जर तुम्ही इंटरनेटचा जास्त वापर करीत असाल तर तुमच्यासाठी ३४९ रुपयांचा प्लान बेस्ट आहे. कारण, या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा दिला जातो. जर तुम्हाला डेटासोबत वैधता जास्त हवी असल्यास तुमच्यासाठी ३९९ रुपयांचा प्लान बेस्ट आहे.

वाचाः सॅमसंगची जबरदस्त ऑफर, TV आणि फ्रिज खरेदीवर महागडे स्मार्टफोन फ्री

वाचाः ६ ऑगस्टपासून अॅमेझॉन प्राईम डे सेल, सामान खरेदी करण्याच्या टीप्स

वाचाः e-SIM फ्रॉडमध्ये लुटले २१ लाख रुपये, तुम्ही अशी काळजी घ्या

वाचाः मित्रों अॅप ३ कोटींहून जास्त डाउनलोड्स, एका महिन्यात ९०० कोटी व्ह्यूज

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज