अ‍ॅपशहर

'आयफोन X'चा स्टॉक काही मिनिटांतच संपला!

अॅपलचा आतापर्यंतचा सगळ्यात महागडा आणि अद्ययावत फोन असलेल्या 'आयफोन X'च्या ऑनलाइन प्री-बुकिंगला भारतात कालपासून सुरुवात झाली. बुकिंग सुरू होताच ग्राहकांच्या या फोनवर अक्षरश: उड्या पडल्या आणि काही मिनिटांतच या फोनचा स्टॉक संपला.

Maharashtra Times 28 Oct 2017, 10:08 am
मटा ऑनलाइन वृत्त । बेंगळुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rs 1 lakh iphone x sold out in minutes
'आयफोन X'चा स्टॉक काही मिनिटांतच संपला!


अॅपलचा आतापर्यंतचा सगळ्यात महागडा आणि अद्ययावत फोन असलेल्या 'आयफोन X'च्या ऑनलाइन प्री-बुकिंगला भारतात कालपासून सुरुवात झाली. बुकिंग सुरू होताच ग्राहकांच्या या फोनवर अक्षरश: उड्या पडल्या आणि काही मिनिटांतच या फोनचा स्टॉक संपला.

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई- कॉमर्स साइटवर कालपासून ही बुकिंग सुरू झाली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी 'आयफोन X'वर आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या होत्या. कॅशबॅक, फोन एक्सचेंजवर ३०,००० ते ३५,००० पर्यंतची सूट अशा ऑफर्स होत्या. अॅमेझॉननं जियो युजर्सना ७०टक्के बायबॅक गॅरण्टी दिली होती. तर, फ्लिपकार्टनं ५२,००० रुपयांपर्यंतच्या बायबॅकची ऑफर दिली होती.

'आयफोन X' हा अॅपलचा पहिला OLED डिस्प्ले असलेला फोन आहे. या फोनला ५.८ इंचाचा बेझलरहित डिस्प्ले असून त्याचं रेझुल्युशन ११२५ x २४३६ पिक्सल आहे. याला 'सुपर रेटिना' असं नाव दिलं गेलंय. 'ग्लास आणि स्टेनलेस स्टील'चा वापर करून हा फोन बनिवण्यात आलाय. फ्रंट आणि बॅक पॅनलही काचेचं आहे. 'आयफोन X' हा अॅपलचा पहिला फोन आहे, ज्याला होम बटण नाही. खालून वरच्या दिशेनं स्वाइप केल्यावर होममध्ये जाता येतं.

अॅपलनं 'आयफोन X'मध्ये ६४ जीबी आणि २५६ जीबी मेमरीचे पर्याय दिले आहेत. यापैकी ६४ जीबी स्टोरेज क्षमता असलेल्या डिव्हाइसची किंमत ८९,००० इतकी आहे तर २५६ जीबी स्टोरेज क्षमता असलेल्या फोनची किंमत १,०२,००० आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज