अ‍ॅपशहर

Vivo Y01 स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत फक्त ८९९९ रुपये, फीचर्स 'लय भारी'

विवो कंपनीने आपला आणखी एक नवीन स्मार्टफोन Vivo Y01 स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या फोनची फीचर्स जबरदस्त आहे. या फोनची किंमत फक्त ८ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची फीचर्स संबंधी सविस्तर जाणून घ्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 May 2022, 4:45 pm
नवी दिल्लीः स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने आज भारतात आपला Vivo Y01 स्मार्टफोन लाँच केला आहे. विवोच्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. सोबत एचडी डिस्प्ले दिला आहे. फोनची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. याशिवाय, कमी बजेट असूनही यात जबरदस्त फीचर्स दिले आहेत. जर तुम्हाला कमी बजेट मध्ये जबरदस्त फीचर्सचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर विवोचा हा फोन एक चांगला ऑप्शन ठरू शकतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Vivo Y01


वाचा: Air Cooler: कडक उकाड्यात मिळेल थंड हवेचा अनुभव, एसीप्रमाणे भिंतीवर टांगता येईल 'हा' स्वस्त कूलर; पाहा किंमत

Vivo Y01 स्मार्टफोनची किंमत
या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनला कंपनीने दोन कलर्समध्ये बाजारात उतरवले आहे. एलिगेंट ब्लॅक आणि सफायर ब्लू अशा दोन रंगात ग्राहक याला खरेदी करू शकतात. या फोनला विवो इंडिया ई-स्टोर सह सर्व रिटेल स्टोर्सवरून खरेदी करू शकतात. बजेट सेगमेंटमध्ये या फोनची टक्कर realme narzo 30A, Redmi 10A या स्मार्टफोन्सशी होईल.

वाचा: Smartphone Offers: भारीच! iPhone ला खूपच स्वस्तात खरेदीची संधी, ‘या’ लेटेस्ट मॉडेलवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट

विवोच्या स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y01 स्मार्टफोन मध्ये ६.५१ इंचाचा एचडी प्लस हॅलो फुल व्ह्यू डिस्प्ले दिला आहे. स्क्रीन आय प्रोटेक्शन मोड ऑफर करीत असल्यास जबरदस्त व्ह्यू, कॉन्टेंट स्ट्रिमिंग, व्हिडिओ कॉलिंग आणि गेमिंग एक्सपीरियन्स मिळू शकतो. हँडसेटमध्ये मीडियाटेक हीलियो पी ३५ प्रोसेसर आणि मल्टी प्रोसेसर आणि मल्टी टर्बो ३.० सारखे फीचर्स मिळतील. फोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मिळू शकते. याशिवाय, फोनच्या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे १ टीबीपर्यंत वाढवता येवू शकते.

वाचा: Air Cooler: कडक उकाड्यात मिळेल थंड हवेचा अनुभव, एसीप्रमाणे भिंतीवर टांगता येईल 'हा' स्वस्त कूलर; पाहा किंमत

विवोच्या या स्मार्टफोनमध्ये ३डी बॅक कव्हर म्हणजेच ८.२८ मिलिमीटर थिन बॉडी दिली आहे. याने प्रीमियम लूक मिळतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. बॅटरी १० वॉट चार्जिंग सपोर्ट करते. फोनमध्ये सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा सेन्सर मिळतो. तर रियर वर ८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. कॅमेऱ्यात फेस ब्युटी, फोटो, व्हिडिओ आणि टाइम सारखे मोड सपोर्ट करते. कंपनीने या फोनला मेक इन इंडिया अंतर्गत बनवले आहे.

वाचा: Smart TV Offers: Flipkart ची धमाकेदार ऑफर! स्वस्तात मिळतोय ३२ इंच स्मार्ट टीव्ही; जाणून घ्या फीचर्स

महत्वाचे लेख