अ‍ॅपशहर

विवोचा Y91i स्मार्टफोन लाँच, किंमत ७९९० ₹

कंपनीने या स्मार्टफोनला २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजमध्ये गेल्यावर्षी लाँच केले होते. म्हणजेच वर्षभरानंतर कंपनीने नवा फोन लाँच केला आहे. भारतीय बाजारात या फोनची सरळ टक्कर रेडमी वाय३ शी होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Mar 2020, 5:05 pm
नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी विवोने आपला बजेटमधील स्मार्टफोन Y91i चा नवीन ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची अधिकृत किंमत कंपनीने वेबसाइटवर अपडेट अद्याप केलेली नाही. परंतु, टेलिकॉमच्या ट्विटच्या माहितीनुसार, या फोनची किंमत ७ हजार ९९० रुपये असणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनला २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजमध्ये गेल्यावर्षी लाँच केले होते. म्हणजेच वर्षभरानंतर कंपनीने नवा फोन लाँच केला आहे. भारतीय बाजारात या फोनची सरळ टक्कर रेडमी वाय३ शी होणार आहे. परंतु, दोन्ही फोनची किंमत एकसारखी असली तरी रेडमी वाय३ या फोनपेक्षा जरा चांगला असल्याचा अनुभव देण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Vivo Y91i


या स्मार्टफोनमधील स्क्रीनवर नजर टाकल्यास दोन्ही फोनची स्क्रीन साइज जवळपास एकसारखी आहे. विवो Y91i मध्ये ६.२२ इंचाचा तर रेडमी वाय३ मध्ये ६.२६ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. दोन्ही एचडी प्लस डिस्प्ले आहे. जे १५२०x७२० पिक्सल रिझॉल्यूशन आहे. विवो Y91i मध्ये ४०३० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे तर Y3 मध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. परंतु, दोन्ही स्मार्टफोनला फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला नाही. विवो Y91i आणि रेडमी वाय३ मध्ये दोन्ही अँड्रॉयड ९ पाय ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आला आहे. प्रोसेसर मध्ये रेडमी वाय३ विवो Y91i च्या पुढे आहे. यात क्वॉलकॉमचे स्नॅपड्रॅगन ६३२ प्रोसेसर आहे. तर विवोमध्ये ४३९ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी विवो Y91i मध्ये १३ प्लस २ मेगापिक्सलचा ड्युअल एआय रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर रेडमी वाय३ मध्ये १२ प्लस २ मेगापिक्सलचा एआय बेस्ड ड्युअल सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी रेडमी वाय ३ या फोनपेक्षा चांगला आहे. यात ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तर विवो Y91i मध्ये केवळ ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

फॅक्ट चेकः रामदेव बाबांना गोमूत्राचा ओव्हर डोस?

१०० ₹ पेक्षा कमी किंमतीचे बेस्ट प्रीपेड प्लान

सॅंमसंग गॅलेक्सी s20+ सेलः आज अखेरचा दिवस

ऑफर! ३००Mbps स्पीडने अनलिमिटेड डेटा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज