अ‍ॅपशहर

यातला तुम्ही कोणता निवडाल?

गेल्या दोन महिन्यात स्मार्टफोन जगतात रथी महारथी कंपन्यांनी आपले सर्वोत्तम गॅझेट उतरवत एकप्रकारे स्मार्टफोन युजर्सना बुचकळ्यात पाडलं. सर्वच फोन फिचर्सच्या बाबतीत तोडीस तोड असल्याने नक्की कुठला फोन आपल्यासाठी 'द बेस्ट' ठरेल हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का?

Maharashtra Times 13 Nov 2017, 12:03 am
गेल्या दोन महिन्यात स्मार्टफोन जगतात रथी महारथी कंपन्यांनी आपले सर्वोत्तम गॅझेट उतरवत एकप्रकारे स्मार्टफोन युजर्सना बुचकळ्यात पाडलं. सर्वच फोन फिचर्सच्या बाबतीत तोडीस तोड असल्याने नक्की कुठला फोन आपल्यासाठी 'द बेस्ट' ठरेल हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का?गेल्या दोन महिन्यात स्मार्टफोन जगतात रथी महारथी कंपन्यांनी आपले सर्वोत्तम गॅझेट उतरवत एकप्रकारे स्मार्टफोन युजर्सना बुचकळ्यात पाडलं. सर्वच फोन फिचर्सच्या बाबतीत तोडीस तोड असल्याने नक्की कुठला फोन आपल्यासाठी 'द बेस्ट' ठरेल हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? काळजी नको, कारण ‘मुंटा’ घेऊन आलाय खास तुमच्यासाठी प्रत्येक गॅझेटची माहिती, जी नक्की उपयोगी ठरेल तुमच्या 'स्मार्ट निवडी'साठी !
महाराष्ट्र टाइम्स.कॉम which one will you choose
यातला तुम्ही कोणता निवडाल?


आयफोन एक्स

स्क्रीन - ५.८ इंच

रिझोल्युशन - ११२५x२४३६ पिक्सेल

रॅम - ३ जीबी

प्रोसेसर - हेक्साकोअर

इंटर्नल मेमरी - ६४ जीबी

कॅमेरा - प्रायमरी : १२ मेगापिक्सेल, फ्रंट - ७ मेगापिक्सेल

ऑपरेटिंग सिस्टीम - आयओएस ११

बॅटरी क्षमता - २७१६ एमएएच

का घ्यावा?

आपल्या लौकिकाला जागत आयफोनने पुन्हा कॅमेराच्या क्षेत्रात क्रांती करत, फेस आयडी, अॅनिमोजी (ANIMOJI) यासारखे फिचर फ्रंट कॅमेराद्वारे लोकांसमोर आणले.

OLED स्क्रीनमुळे एक उत्कृष्ट दृश्य अनुभव तुम्हाला घेता येईल. कारण डिस्प्लेच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत याची व्याप्ती असेल.

सॅमसंग गॅलक्सी ८

स्क्रीन - ६.३ इंच

रिझोल्युशन - १४४०x२९६० पिक्सेल

रॅम - ६ जीबी

प्रोसेसर - १.७ गिगाहर्ट्झ octaकोअर

इंटर्नल मेमरी - ६४ जीबी

कॅमेरा - प्रायमरी : १२ मेगापिक्सेल, फ्रंट - ८ मेगापिक्सेल

ऑपरेटिंग सिस्टीम - अँड्रॉइड ७.१.१ नोगट

बॅटरी क्षमता - ३३०० एमएएच

का घ्यावा?

सर्वोत्तम डिस्प्ले, जो प्रखर सूर्यप्रकाश असो वा मिट्ट अंधार, नेहमी तुमच्या डोळ्यांना सुखावेल.

उत्कृष्ट ‎स्टायल्स - प्रेशर सेन्सर तंत्रज्ञानाचा अनोखा नमुना ज्याद्वारे टेक्स्ट हायलाईट, चित्र रेखाटणं यासारख्या गोष्टी तुम्ही सहज करू शकता.

कॅमेरा आणि फोटोंची चांगली गुणवत्ता

वन प्लस ५

स्क्रीन - ५.५ इंच

रिझोल्युशन - १०८०x१९२० पिक्सेल, रॅम - ६ जीबी

प्रोसेसर - १.९ गिगाहर्ट्झ ऑक्टाकोअर

इंटर्नल मेमरी - ६४ जीबी

कॅमेरा - प्रायमरी : २० मेगापिक्सेल, फ्रंट - १६ मेगापिक्सेल

ऑपरेटिंग सिस्टीम - अँड्रॉइड ७.१.१

बॅटरी क्षमता - ३३०० एमएएच

का घ्यावा?

३३०० एमएएच बॅटरी जिच्या जोरावर तुम्हाला पूर्ण दिवस (किंबहुना त्याहूनही अधिक) चार्जिंगशिवाय फोन वापरता येतो.

सर्वात जलद फिंगरप्रिंट स्कॅनर.

६ जीबी रॅम आणि जबरदस्त प्रोसेसरच्या जोरावर मल्टिटास्किंगमध्ये कोणताही अडथळा येणार नाही.

परवडणारी किंमत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज