अ‍ॅपशहर

या प्रोसेसरसोबत हुवावे भारतात लाँच करणार वायरलेस डिव्हाइस

चीनची प्रसिद्ध कंपनी हुवावे भारतात वायरलेस डिव्हाइस लाँच करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच झालेल्या पत्रकार परिषदेत कंपनीनं किरीन ए१ चिपसेट सादर केली होती. या चिपसेटसोबतच कंपनी आणखी एक नवं प्रोडक्ट भारतीय बाजारपेठेत लाँच करणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Nov 2019, 10:17 am
नवी दिल्लीः चीनची प्रसिद्ध कंपनी हुवावे भारतात वायरलेस डिव्हाइस लाँच करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच झालेल्या पत्रकार परिषदेत कंपनीनं किरीन ए१ चिपसेट सादर केली होती. या चिपसेटसोबतच कंपनी आणखी एक नवं प्रोडक्ट भारतीय बाजारपेठेत लाँच करणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम WATCH


जगभरात सध्या वेअरेबल टेक प्रोडक्टची क्रेझ वाढत चालली आहे. हे लक्षात घेऊनचं कंपनीनं किरीन ए-१ चिपसेटची निर्मिती केली आहे. हे प्रोसेसर स्मार्टवॉच, स्मार्टग्लास, इअरफोनमध्ये वापरता येऊ शकते.

प्रोसेसर

हा प्रोसेसर तयार करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचा वापर केला आहे. कॉर्टेक्स एम-७ कोर देण्यात आलं आहे. तसंच, प्रोसेसरचे ग्राफिक प्रोसेसिंग युनिट गरज असेल तेव्हाच अॅक्टिव्ह होतात.

ब्लूट्यूथ कनेक्शन

प्रोसेसरमध्ये ड्यूल चॅनेल ब्लूट्यूथ कनेक्शन दिलं आहे. ज्यात ब्लूट्यूथ लो एनर्जी आणि ब्लूटूथ ५.१चा वापर ड्यूल मोडमध्ये करता येईल. यामुळं वायरलेस डिव्हाइसला अधिक चांगल्या क्षमतेची कनेक्टिव्हीटी मिळेल व विजेची बचतदेखील होईल.

प्रोसेसरसोबत हे डिव्हाइस लाँच होण्याची शक्यता

किरीन ए१ प्रोसेसर भारतात वायरलेस डिव्हाइससोबत लाँच होणार असल्याच या आधीच जाहीर केलं होतं. मात्र, कोणत्या डिव्हाइससोबत लाँच होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. कंपनी हुवावे फ्रीबड्स ३ आणि हुवावे वॉच जीटी २या डिव्हाइसमध्ये किरीन ए१प्रोसेसर देण्यात येणार असल्याचं बोललं जातंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज