अ‍ॅपशहर

मोठी स्क्रीन, तगडी बॅटरी...'रेडमी नोट ५' येतोय!

'रेडमी नोट ४'ला मिळालेल्या उंदड प्रतिसादानंतर आता श्याओमी कंपनी या मालिकेतील पाचवी आवृत्ती घेऊन येतेय. 'रेडमी नोट ५' लवकरच चीनमध्ये लाँच करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. या फोनची काही फिचर्स 'लीक' झाली असून ती मोबाइलप्रेमींना नक्कीच भुरळ पाडणारी आहेत.

Maharashtra Times 18 Nov 2017, 5:14 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम xiaomi redmi note 5 smartphone briefly listed online
मोठी स्क्रीन, तगडी बॅटरी...'रेडमी नोट ५' येतोय!

'रेडमी नोट ४'ला मिळालेल्या उंदड प्रतिसादानंतर आता श्याओमी कंपनी या मालिकेतील पाचवी आवृत्ती घेऊन येतेय. 'रेडमी नोट ५' लवकरच चीनमध्ये लाँच करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. या फोनची काही फिचर्स 'लीक' झाली असून ती मोबाइलप्रेमींना नक्कीच भुरळ पाडणारी आहेत.

'रेडमी नोट ५'ची स्क्रीन ५.९ इंची असेल, असं समजतं. एक ३ जीबी रॅमचा आणि एक ४ जीबी रॅमचा, असे दोन हँडसॅट कंपनीने तयार केलेत. ३ जीबी रॅमच्या फोनची मेमरी ३२ जीबी असेल, तर ४ जीबीच्या सुपरफास्ट हँडसेटची इंटरनल मेमरी ६४ जीबी असेल, असं JD.com या वेबसाइटवरील बातमीत म्हटलंय.

'रेडमी नोट ५'ची आणखी काही फीचर्स अशीः

> क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर
> १२ मेगापिक्सल बॅक कॅमेरा
>५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
> अँड्रॉइड व्हर्जन '७.१ नॉगट'
> ४०००mAh' क्षमतेची बॅटरी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज