अ‍ॅपशहर

शाओमीचा 'नोट ५ A' लाँच

'रेडमी नोट ४' च्या यशानंतर शाओमीने 'नोट ५' सिरीजमधला पहिला फोन लाँच केला आहे. हा फोन दोन अॅडिशनमध्ये उपलब्ध होणार आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे हा फोन 'MIUI ९' वर रन होणार आहे.

Maharashtra Times 22 Aug 2017, 7:08 pm
मटा ऑनलाइन वृत्त। नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम xiaomi redmi note 5a launched in china features specifications and price
शाओमीचा 'नोट ५ A' लाँच


'रेडमी नोट ४' च्या यशानंतर शाओमीने 'नोट ५' सिरीजमधला पहिला फोन लाँच केला आहे. हा फोन दोन अॅडिशनमध्ये उपलब्ध होणार असून, या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे हा फोन 'MIUI ९' वर रन होणार आहे.

शाओमीने 'नोट ५ A' ला ५.५ इंचाचा एच डी डिस्पले व स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसरसोबत २ जीबी रॅम दिली आहे. 'नोट ५ A' मध्ये १६ जीबी पर्यंत स्टोरेज व १३ MP प्रायमरी व ५ MP फ्रंट कॅमेरा आहे. तर 3080mAh बॅटरी दिली आहे.

हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. एक ३२ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोरेज असलेला. दुसऱ्या फोनमध्ये ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे. या फोनच्या हायर व्हेरिएंटमध्ये दोन रॅम व फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहेत. त्याचबरोबर स्नॅपड्रॅगन ४३५ प्रोसेसर व १६ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे.

अजुनतरी हा स्मार्टफोन फक्त चीनमध्येच लाँच झाला आहे. पण लवकरच भारतीय बाजारपेठेतही लाँच करण्यात येणार आहे. बेसिक व्हेरिएंट (२ जीबी रॅम व १६ जीबी मेमरी) असणाऱ्या फोनची किंमत ६,७०० रुपये आहे. तर फिंगरप्रिंट सेन्सर असणाऱ्या प्रीमीअर व्हेरिएंटची किंमत ३ जीबी रॅमसाठी ८, ६०० रुपये व ४ जीबी रॅमसाठी ११, ५०० रुपये असणार आहे.

शाओमी रेडमी 'नोट ५ A' शॅम्पेन गोल्ड, रोज गोल्ड, प्लॅटीनम सिल्व्हर या रंगाचे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच डिव्हाईसचे फिंगरप्रिंट सेन्सर पाठीमागे दिले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज