अ‍ॅपशहर

Fact Check: रॉड्रिगो दुतर्ते यांच्या सन्मानासाठी भारतात सुट्टीची घोषणा?

फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतर्ते हे भारत दौऱ्यावर येणार म्हणून त्यांच्या सन्मानासाठी भारताने सुट्टी जाहीर केली आहे. असा दावा करणाऱ्या काही पोस्ट फेसबुकवर व्हायरल झाल्या आहेत. दुर्तते यांना लिजेंड अशी उपाधी देत त्यांच्या फोटोसह दोन पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Feb 2019, 12:43 pm
फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतर्ते हे भारत दौऱ्यावर येणार म्हणून त्यांच्या सन्मानासाठी भारताने सुट्टी जाहीर केली आहे. असा दावा करणाऱ्या काही पोस्ट फेसबुकवर व्हायरल झाल्या आहेत. दुर्तते यांना लिजेंड अशी उपाधी देत त्यांच्या फोटोसह दोन पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम philippines


पहिल्या फोटोत दुर्तते हे राजपथबाहेर एका काळ्या रंगाच्या गाडीतून बाहेर पडताना दिसत आहेत. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे स्वागत करताना दिसत आहेत. तसेच या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी दिसत आहे.

दुसऱ्या फोटोत राजपथवर गणराज्य दिनाच्या परेडचे दृश्य दिसत आहेत. चारही बाजुंनी लोकांची गर्दी दिसत आहे. या फोटोत दुतर्ते दिसत नाही.

हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलंय, राष्ट्रपती रॉड्रिगो दुतर्ते भारतात आहेत. या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी केवळ रेड कार्पेट नव्हे तर स्ट्रीट पार्टीही देण्यात आली आहे. तसेच त्यांचा उचित सन्मान व्हावा यासाठी भारतात सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. फिलिपिन्सचा नागरिक असल्याने मला अभिमान आहे. (पोस्ट भाषांतरीत)



व्हायरल झालेल्या पोस्टमधून एक पोस्ट आता डिलीट करण्यात आली आहे. परंतु, त्याचा आर्काइव्ड वर्जन या ठिकाणी पाहू शकता.

खरं काय आहे?

दुतर्ते भारत दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्यासाठी भारताने कोणतीही सुट्टी जाहीर केली नाही. तसेच त्यांच्या सन्मानासाठी कोणताही स्ट्रीट परेड नव्हती. हा फोटो जुना आहे. गेल्यावर्षी २६ जानेवारीच्या परेड दरम्यान हा फोटो क्लिक करण्यात आला होता.

गेल्यावर्षी गणराज्य दिनानिमित्त शेजारी राष्ट्रांतील नेत्यांना बोलावण्यात आले होते. त्या नेत्यांमध्ये दुतर्ते यांचाही समावेश होता.

दुतर्ते यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली नव्हती तर गणराज्य दिनासाठी हे सर्व लोक आले होते.

कशी केली पडताळणी ?

गुगलच्या रिव्हर्स इमेज टूलमधून आम्हाला हा फोटो PCOO (प्रेजिडेंशल कम्युनिकेशंस ऑपरेशंस ऑफिस ऑफ द रिपब्लिक ऑफ फिलिपिन्स) च्या वेबसाइटवर मिळाला.

या फोटोला कॅप्शन दिले होते, राष्ट्रपती रॉड्रिगो दुतर्ते २६ जानेवारी, २०१८ रोजी भारताच्या गणराज्य दिनात सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीच्या प्रवासी केंद्रात पोहोचले.

दुसरा फोटो लांब अंतरावरून काढला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुतर्ते यांच्या स्वागतासाठी उभे राहिल्याचे दिसत आहेत.

व्हायरल पोस्ट्समध्ये दिसलेला दुसरा फोटोही या वेबसाइटवर आहे. २६ जानेवारी २०१८ रोजी भारताच्या गणराज्य दिनानिमित्त प्रवासी भारतीय केंद्र, नवी दिल्लीत लोकांची गर्दी. या उत्साहात बोलावण्यात आलेल्या पाहुण्यांत राष्ट्रपती रॉड्रिगो दुतर्ते हेही सहभागी झाले.

दुतर्ते यांच्यासह दक्षिण आशियाई देशातील अन्य ९ नेते या गणराज्य दिनात सहभागी झाले. हे सर्व नेते दिल्लीत २५-२६ जानेवारी रोजी आसियान सम्मेलनासाठी भारतात पोहोचले होते.

या नेत्यांच्या दौऱ्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी वाचू शकता.

तसेच ASEAN च्या वेबसाइटवरही यासंबंधी अधिक वाचू शकता.

गणराज्य दिनानिमित्त देशात सार्वजनिक सुट्टी असते. दुतर्ते यांच्या सन्मानासाठी कोणत्याही सुट्टीची घोषणा करण्यात आली नव्हती.

निष्कर्ष

फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतर्ते यांच्या भारत दौऱ्यादरम्यान भारताने कोणत्याही सुट्टीची घोषणा केली नव्हती. तसेच स्ट्रीट पार्टीचे आयोजन केले नव्हते, असे 'मटा फॅक्ट चेक'च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज