अ‍ॅपशहर

Fact Check: केरळमध्ये PFI च्या रॅलीत बेड्या घातलेले RSS च्या ड्रेसमध्ये दिसले तरूण, जाणून घ्या खरं कारण

सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यावरून आता वाद उभा राहिला आहे. खरं म्हणजे, या परेडमध्ये आरएसएसच्या गणवेशात काही तरुणाला बेड्या घातल्याचे दिसत आहे. तसेच इस्लामिक घोषणा बाजी करण्यात येत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Feb 2021, 5:16 pm
केरळ मधील चेलारी मध्ये गेल्या काही दिवसांपासून फ्रंट ऑफ इंडियाने आपला स्थापना दिनानिमित्त एका रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यावरून आता वाद उभा राहिला आहे. खरं म्हणजे, या परेडमध्ये आरएसएसच्या गणवेशात काही तरुणाला बेड्या घातल्याचे दिसत आहे. तसेच इस्लामिक घोषणा बाजी करण्यात येत आहे. हिंदुत्वादी संघटनांनी यावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान आमच्या टीमने याचा फॅक्ट चेक केले आहे तर यावेळी आम्हाला आणखी काही फोटो मिळाले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Fact Check


खरं म्हणजे, १७ फेब्रुवारी रोजी स्थापना दिनानिमित्त प्रसिद्ध फ्रंट ऑफ इंडियाने केरळच्या चेलारी मध्ये एकता मार्च काढला होता. या एकता मार्च मध्ये धार्मिक आणि जातीयवादी भेदभाव विरोधात मेसेज देण्यात आला होता. या मार्चचा एक भाग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात आरएसएसच्या गणवेशा सोबत इंग्राजाच्या गणवेशातील तरुणाला बेड्या ठोकलेल्या दिसत आहेत.

व्हिडिओत हे दृश्य दिसले
या तरुणांच्या मागे काही लोक अल्लाह हू अकबर च्या घोषणा दिल्या जात असल्याचे दिसत आहे. या दरम्यान, बेड्या बांधून तरुणांना रॅली काढली जात आहे. यासोबतच मागून लाठ्या काठ्या हातात असल्याचे दिसत आहेत.

आरएसएसचा गणवेश नाही, फासीवादच्या विरोधाचे प्रतिक

रॅली आयोजित करणाऱ्या सदस्यांच्या म्हणण्यानुसार, ज्याला आरएसएसचे गणवेश म्हटले जात आहे. ते फॅसिझमच्या विरोधाचे प्रतिक आहे. रॅलीचे मुख्य थीम एकता वर आधारित होती. ज्यावरून जास्त भागात हे दाखवण्यात आले होते की, मुस्लिमांनी कसे इंग्रजांना विरोध केला होता. याचा संदेश एकता दिन निमित्त करण्यात आला आहे. म्हणून याला भडकावू प्रदर्शन म्हटले जाऊ शकत नाही.

इंग्रजाविरोधात लढाईला रॅलीत दाखवले
पीएफआयचे महासचिव अनीस अहमद ने मीडियाशी बोलताना सांगितले की, या रॅलीची थीम १९२१ मध्ये इंग्रजाविरुद्ध करण्यात आलेल्या मापिला क्रांतीशी संबंध आहे. हे मालाबारच्या लोकांचे इतिहास दर्शवतो. ज्यांनी १९२१ मध्ये इंग्रजाविरुद्ध लढाई लढली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज