अ‍ॅपशहर

Fact Check: कर्फ्यूत बाहेर जाण्यासाठी ई-पास देणारी वेबसाइट दिल्ली सरकारची आहे

सोशल मीडिया युजर्सने एक लिंक शेअर केली आहे. दिल्लीत कर्फ्यूत गरजेच्या वस्तूं खरेदी करण्यासाठी बाहेर जाण्यासाठी लोकांना ई-ट्रॅवल पास दिली जात आहे. भारतात करोना व्हायरससंबंधी अनेक बातम्या खोटा पसरवल्या जात असल्या तरी त्यात काही व्हायरल झालेल्या बातम्या खऱ्या सुद्धा असताता

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Mar 2020, 2:59 pm
दावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम delhi


अनेक सोशल मीडिया युजर्सने एक लिंक शेअर केली आहे. दिल्लीत कर्फ्यूत गरजेच्या वस्तूं खरेदी करण्यासाठी बाहेर जाण्यासाठी लोकांना ई-ट्रॅवल पास दिली जात आहे.

वेबसाइट https://epass.jantasamvad.org/epass/relief/english/ केवळ लोकांना ई-पास साठी अर्ज करण्याचा पर्याय देत नाही तर यात जेवण, रेशन, कामगारांसाठी ५ हजार रुपयांची नुकसान भरपाई आणि पेन्शन साठी अर्ज करण्याचा पर्याय या वेबसाइटवर आहे.


टाइम्स फॅक्ट चेकच्या काही वाचकांनी आम्हाला यासंबंधीची माहिती सांगितली. ही वेबसाइट सरकारची आहे की नाही, याची माहिती जाणून घेण्याची विनंती केली.

खरं काय आहे?

हो, ही वेबसाइट खरी आहे.

दिल्ली सरकारने गुरुवारी सकाळी ही वेबसाइट लोकांसाठी बनवली आहे. टाइम्स फॅक्ट चेकने दिल्ली सरकारच्या सूत्रांना या वेबसाइटसंबंधी विचारले असता ते म्हणाले की, ही वेबसाइट खरी आहे. तसेच या वेबसाइटची लिंकही खरी आहे. ही वेबसाइट लोकांच्या मदतीसाठी सुरू केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज