अ‍ॅपशहर

Fake Alert: २०१३ च्या फोटोला आता कृषि विधेयकाशी जोडून केले जात आहे शेयर

रविवारी राज्यसभेत दोन कृषि विधेयक मंजूर झाल्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो खूप शेयर केला जात आहे. फोटोत एक विट हातात घेतलेल्या वयोवृद्धावर पोलिसांनी बंदूक तैनात केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Sep 2020, 3:00 pm
दावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Fake Alert


रविवारी राज्यसभेत दोन कृषि विधेयक मंजूर झाल्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो खूप शेयर केला जात आहे. फोटोत एक विट हातात घेतलेल्या वयोवृद्धावर पोलिसांनी बंदूक तैनात केली आहे.

फोटो सोबत कॅप्शन लिहिले आहे की, ‘मत मारो गोलियो से मुझे मैं पहले से एक दुखी इंसान हूँ..! मेरी मौत की वजह यही हैं कि मैं पेशे से एक किसान हूँ..!’ कॅप्शनवरून हाच संदेश जातो की, हा फोटो नुकताच राज्यसभेत मंजूर करण्यात आलेल्या कृषि विधेयकावरून केंद्र सरकारवर टीका करण्यासाठी शेयर करण्यात येत आहे.



खरं काय आहे ?


फोटो २०१३ मधील आहे. या फोटोचा कृषि विधेयकाशी काही देणे-घेणे नाही.

कशी केली पडताळणी ?

फोटोला गुगलवर रिवर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला इंडियन एक्स्रेसची रिपोर्ट मिळाली. जी ३० सप्टेंबर २०१३ रोजी छापली होती. या रिपोर्टमध्ये हाच फोटो आहे. जो आता शेयर करण्यात येत आहे.

रिपोर्टच्या शीर्षकानुसार, मेरठमध्ये प्रतिबंधित महापंचायतवळी पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत ६ लोक जखमी झाले आहेत. ही महापंचायत स्थानिक भाजप आमदारा संगीत सोमवर मुझफ्फरनंगर दंगली प्रकरणी नॅशनल सिक्योरिटी अॅक्ट लावल्याने आणि अटक केल्याच्या विरोधात बोलावण्यात आली होती.

फोटोसाठी न्यूज एजन्सी पीटीआयला क्रेडिट देण्यात आले होते. तसेच कॅप्शन लिहिले होते की, खेडात रविवारी झालेल्या झटापटी दरम्यान एका गावकऱ्यावर बंदूक तैनात करताना पोलीस कर्मचारी.



निष्कर्ष

२०१३ मधीले एक फोटो आता कृषि विधेयकाला जोडून शेयर केले जात असल्याचे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

महत्वाचे लेख