अ‍ॅपशहर

18 'OTT ॲप्स'वर बंदी ; अश्लील मजकूर प्रसारित केल्याबद्दल सरकारची कडक कारवाई

भारत सरकारने अश्लील कन्टेन्ट प्रसारित करणाऱ्या OTT प्लॅटफॉर्मवर कठोर कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अश्लील मजकूर दाखवणारे 18 OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक केले आहेत. या यादीमध्ये 18 OTT प्लॅटफॉर्म, 19 वेबसाइट आणि 10 ॲप्सचा समावेश आहे.

Edited byसिद्धेश जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Mar 2024, 6:14 pm
सध्या एन्टरटेन्मेण्टच्या नावाखाली ओटीटी प्लॅटफॉर्म्स, सोशल मीडिया यांचा वापर बेसुमार वाढला आहे. बऱ्याचदा या सोशल प्लॅटफॉर्मवरील कन्टेन्ट मात्र कायदयाच्या मर्यादा पळतांना दिसत नाही. याच अनुषंगाने 18 OTT प्लॅटफॉर्म, 19 वेबसाइट आणि 57 सोशल मीडिया हँडलवर भारत सरकारने बंदी घातली आहे. या प्लॅटफॉर्मवरून अश्लील मजकूर प्रसारित केला जात होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम OTT Apps Ban


18 OTT प्लॅटफॉर्म अवरोधित

भारत सरकारने अश्लील कन्टेन्ट प्रसारित करणाऱ्या OTT प्लॅटफॉर्मवर कठोर कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अश्लील मजकूर दाखवणारे 18 OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक केले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या सर्व प्लॅटफॉर्मवर याआधी अनेक इशारे जारी केले होते, परंतु या इशाऱ्यांचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. याच क्रमाने आता सरकारने मोठे पाऊल उचलत या सर्व प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे.

X (ट्विटर) हँडलद्वारे माहिती

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) इंडियाने त्यांच्या अधिकृत X (ट्विटर) हँडलद्वारे सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली. ट्विटमध्ये म्हटले आहे की, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अश्लील मजकूर दाखवणाऱ्या OTT प्लॅटफॉर्मवर कडक कारवाई केली आहे आणि त्यांना ब्लॉक केले आहे. या यादीमध्ये, 18 OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्यात आले आहेत, जे त्यांच्या प्लॅटफॉर्मवर बऱ्याच काळापासून अश्लील कन्टेन्ट प्रसारित करत होते. याशिवाय, केवळ OTT प्लॅटफॉर्मच नाही तर त्यात 19 वेबसाइट, 10 ॲप्स आणि 57 सोशल मीडिया हँडलचाही समावेश आहे.

हे 18 OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्यात आले

ब्लॉक केल्या जाणाऱ्या 18 ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये ड्रीम फिल्म्स, वूवी, येस्मा, अनकट अड्डा, ट्राय फ्लिक्स, एक्स प्राइम, निऑन प्ले या OTT प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. यापैकी एका OTT प्लॅटफॉर्मला Google Play Store वर 1 कोटी डाउनलोड मिळाले आहेत, तर दोन प्लॅटफॉर्म 50 लाखांहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहेत.

57 सोशल मीडिया हँडलवर बंदी

बंदी घातलेल्या 57 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल बोलायचे तर त्यात फेसबुकची 12 खाती, इंस्टाग्रामची 17 खाती, X (ट्विटर)ची 16 खाती आणि यूट्यूबची 12 खाती आहेत. या सर्व प्लॅटफॉर्मवर अनेकवेळा इशारे देण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. तथापि, या प्लॅटफॉर्मने केवळ इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले नाही तर अशा सामग्रीचे प्रसारण सुरूच ठेवले. हे पाहता आता सरकारने देशभरातील हे सर्व प्लॅटफॉर्म ब्लॉक केले आहेत.
लेखकाबद्दल
सिद्धेश जाधव
सिद्धेश जाधव जवळपास 6 वर्ष डिजिटल मीडियामध्ये टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. सुरुवातीपासूनच टेक विषयी माहिती वाचकांना समजेल अशा सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. कामाव्यतिरिक्त सिद्धेशला प्रवास करायाला आवडतं. नेहमीच तो वेगवेगळ्या गड किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक ठिकाणी फिरत असतो. फावल्या वेळात त्याला चित्रपट बघायला आवडतात. कधीकधी तो आपल्या भावना आणि विचार चारोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज