अ‍ॅपशहर

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २२ नोव्हेंबर २०२१: २५ हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

अॅमेझॉनच्या डेली अॅप क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना तब्बल २५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे.यूजर्स Amazon च्या अँड्राइड आणि आयओएस मोबाइल अ‍ॅपद्वारे क्विजमध्ये सहभागी होऊ शकतात.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Nov 2021, 10:14 am

हायलाइट्स:

  • अॅमेझॉनच्या क्विजला सुरुवात.
  • २५ हजार रुपये जिंकण्याची संधी.
  • बक्षीस जिंकण्यासाठी पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे.
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Amazon
नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना Amazon Pay balance स्वरुपात २५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये यूजर्सला ५ प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. हे प्रश्न सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींवर आधारित असते.
वाचा: Airtel vs Jio vs Vi: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत ५६ दिवस वैधता, पाहा कोणाचा प्लान बेस्ट?

या क्विजमध्ये यूजर्स Amazon च्या अँड्राइड आणि आयओएस मोबाइल अ‍ॅपद्वारे सहभागी होऊ शकतील. क्विजला रात्री १२ वाजता सुरुवात होते व यूजर्स पुढील २४ तास यात भाग घेऊ शकतात. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते.

आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न व त्याची उत्तरे

1. भारतात १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो. मात्र, संयुक्त राष्ट्राद्वारे जागतिक बालदिन कधी साजरा केला जातो?

उत्तर – २० नोव्हेंबर

2. २०२१ मध्ये संयुक्त राष्ट्राची हवामान बदलांसंबंधीची परिषद कोणत्या शहरात होत आहे?

उत्तर – ग्लासगो

3. तारा सुतारिया आणि अहान यांचा तडप हा चित्रपट लवकरच येणार असून, या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अहान हा कोणत्या अभिनेत्याचा मुलगा आहे?

उत्तर – सुनिल शेट्टी

4. खालील पैकी कोणत्या राशीचे चिन्ह हे खेकडा आहे?

उत्तर – कर्क

5. कोणत्या देशाचे ऑलिम्पिकच्या इतिहासात सात खेळांमध्ये आतापर्यंत केवळ २ सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे?

उत्तर - फिजी

वाचा: Amazon Offer: Samsung च्या या फोनवर तब्बल २८ हजारांची सूट, फोटोग्राफीसाठी मिळतो शानदार कॅमेरा

वाचा: Samsung Galaxy A13: Samsung च्या सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनचे डिटेल्स लीक, पाहा फीचर्स

वाचा: Expensive Smartwatches: या स्मार्टवॉचेसची किंमत लाखांच्या घरात, यात काय खास, पाहा डिटेल्स

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज