अ‍ॅपशहर

पासवर्ड आणि बँकिंग डेटा चोरणारे ३३७ अॅप्स, तात्काळ डिलीट करा

स्मार्टफोनवरून डेटा चोरण्यासाठी हॅकर्स नवीन-नवीन पद्धत शोधत आहेत. आता हॅकर्संनी नवीन अँड्रॉयड मेलवेयरला तयार केले आहे. जे एकासोबत सर्व डेटा चोरण्यात सक्षम आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jul 2020, 7:16 pm
नवी दिल्लीः स्मार्टफोनवरून डेटा चोरण्यासाठी हॅकर्स नवीन-नवीन पद्धत शोधत आहेत. आता हॅकर्संनी नवीन अँड्रॉयड मेलवेयरला तयार केले आहे. जे एकासोबत सर्व डेटा चोरण्यात सक्षम आहेत. या मेलवेयरचे नाव BlackRock आहे. यावर्षीच्या मे महिन्यात हे समोर आले होते. रिपोर्टच्या माहितीनुसार, हॅकर्स ३३७ अॅप्सद्वारे युजर्संना आपले लक्ष्य करीत आहे. ज्यात मेलवेयर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम blackrock malware


वाचाः रियलमीच्या या फोनचा आज सेल, किंमत १० हजारांपेक्षा कमी
ThreatFabric च्या रिपोर्टनुसार, हे मेलवेयर दुसऱ्या बँकिंग ट्रोजन प्रमाणे काम करतो. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे अॅप्सला टार्गेट करू शकतो. हे केवळ युजर्संची लॉगिन क्रेडिंशियल (यूजरनेम आणि पासवर्ड) चोरीत नाहीत तर त्यातील पेमेंट कार्ड्सची डिटेल्स टाकण्यासाठी भाग पाडतो.

वाचाः फिलिप्सने आणले दोन जबरदस्त स्मार्ट TV, पाहा किंमत


मेलवेयर असे करे काम
हे मेलवेयर तुमच्या डिव्हाईसमध्ये सर्वात आधी अॅप ड्रोअर पासून आयकॉन लपवतो. त्यामुळे युजर्सला माहिती होत नाही की, त्यांना कोणत्या अॅपपासून त्रास होत आहे. दुसऱ्या स्टेपला तुमच्या फोनच्या Accessibility फीचरला ऑन करतो. त्यानंतर गुगल अपडेटच्या नावावर फोनचा पूर्ण अॅक्सेस मागतो. त्यानंतर फोनमध्ये काही सेव्ह केल्यास त्याची माहिती हॅकर्सला कळते.

वाचाः सॅमसंगचा नवा फोन भारतात लाँच, किंमत ९९९९ ₹


३३७ अॅप्सची यादी जारी

ThreatFabric ने आपल्या रिपोर्टमध्ये ३३७ अॅप्सची यादी जारी केली आहे. युजर्संचा पासवर्ड आणि बँकिंग कार्ड डेटा चोरण्याचे काम हे अॅप्स करीत असतात. हॅकर्स यातून डेटिंगपासून न्यूज, शॉपिंग, लाईफस्टाईल आणि प्रोडक्टिविटी यासारख्या अॅप्सचा वापर करीत असतात.

वाचाः डोळ्यासारखा फिरणार फोनचा कॅमेरा, हटके फोन भारतात लाँच

वाचाः iQOO ने लाँच केला स्वस्तातील स्मार्टफोन, पाहा किंमत

वाचाः एअरटेलची ऑफर, iPhone खरेदीवर ३६०० रुपयांची सूट

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज