अ‍ॅपशहर

मस्त! हॉलिवूडमधील लग्झरी फॅन भारतात लाँच

हॉलिवूडच्या चित्रपटात हमखास दिसणारा लग्झरी फॅन भारतात लाँच करण्यात आला आहे. या फॅनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याला केवळ सिंगल ब्लेड आहे. या फॅनची किंमत ९२ हजार रुपये इतकी आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Mar 2020, 5:55 pm
नवी दिल्लीः हॉलिवूडच्या चित्रपटात हमखास दिसणारा लग्झरी फॅन भारतात लाँच करण्यात आला आहे. लग्झरी आणि स्मार्ट होम उत्पादने बनवणारी कंपनी Luxaire ने भारतात आपला नवीन फॅन LUX 1020 लाँच केला आहे. या फॅनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या फॅनला केवळ सिंगल ब्लेड आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम FAN


एबीएस ब्लेड मध्ये खास डिझाइन करण्यात आलेल्या एअरोफ्वॉइल प्रोफाइल आहे. यामुळे पंखा कमी आरपीएमवर चालू शकतो. आणि ४२०० सीएफएमचे उच्च वायू प्रवाह देतो. सामान्य पंख्यांच्या तुलनेत हा फॅन अर्ध्या वीजेवर जास्त हवा देतो. म्हणजेच, छोट्या खोलीत कमीत कमी आवाजात कुलिंग देण्याचे काम हा फॅन करणार आहे, असे कंपनीचा दावा आहे. फॅनची डिझाइन व्हर्च्युअली हवा आहे. त्यामुळे कोणत्याही गोंगाटाला दूर करण्याचे काम करते. हा फॅन लक्स १०२० कलाचा एक जबरदस्त नमूना आहे. जो ड्युअल माउंटिंग ऑप्शनमध्ये येतो. या फॅनची मोटरची वॉरंटी १५ वर्ष असून याची किंमत ९२ हजार रुपये आहे.

करोनाची कॉलर ट्यून बंद करण्यासाठी 'हे' करा

याआधी कंपनीने लक्झेयरने भारतात आयओटी इनबेल्ट लक्स ५१३० स्मार्ट फॅन लाँच केला होता. या फॅनमध्ये ब्रशलेस डीसी मोटर बसवण्यात आली होती. या पंख्यात तीन डॅन आहे. परंतु, लक्झेयरच्या या स्मार्ट फॅनमध्ये ४ डॅन आहेत. या फॅनला रिमोट कंट्रोलवरून कंट्रोल करता येते. या फॅनमध्ये वाय-फायचा सपोर्ट देण्यात आला आहे. याचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात रेग्युलेटर लावण्याची गरज नाही. या पंख्यात अॅमेझॉन अलेक्साचा सपोर्ट आहे. त्यामुळे आवाजावरून हा फॅन चालू बंद करता येवू शकतो.

BSNL च्या २४७ ₹ प्लानमध्ये ३ GB डेटा

रियलमी ६ चा आज पहिला सेल; 'या' ऑफर्स

मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवणे अवघड

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज