अ‍ॅपशहर

'विक्रम'ची स्थिती काय?; इस्रोने दिली 'ही' माहिती

चंद्राच्या भूमीवर सुरक्षित असलेल्या विक्रम लँडरशी अजूनही संपर्क होऊ शकलेला नसल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ट्विटद्वारे दिली आहे. विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचेही इस्रोने म्हटले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Sep 2019, 1:04 pm
नवी दिल्ली: चंद्राच्या भूमीवर सुरक्षित असलेल्या विक्रम लँडरशी अजूनही संपर्क होऊ शकलेला नसल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ट्विटद्वारे दिली आहे. विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचेही इस्रोने म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chandrayan-2-maharashtratim


विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभूमीवर आडव्या स्थितीत पडला असल्याची माहिती सोमवारी इस्रोच्या हाती लागली होती. ऑर्बिटरने पाठवलेल्या छायाचित्रांमध्ये विक्रम लँडर सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे इस्रोने स्पष्ट केले होते. विक्रम लँडरची कोणत्याही प्रकारची तूटफूट झाली नसल्याचे या छायाचित्राद्वारे स्पष्ट झाले. यानंतर शास्त्रज्ञांनी विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले.


२२ जुलै या दिवशी प्रक्षेपण झाल्यानंतर 'चांद्रयान-२' ४७ दिवसांचा प्रवास करत आणि सर्व अडथळे पार करत चंद्राच्या जवळ पोहोचले होते. ६-७ दरम्यानच्या रात्री विक्रम लँडरसह रोव्हक प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरले. मात्र चंद्राच्या भूमीपासून २.१ किमीच्या अंतरावर असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला.

मात्र, 'चांद्रयान-२' ने आपले ९५ टक्के लक्ष्य प्राप्त केल्याचे इस्रो आणि सर्व शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे. 'चांद्रयान-२'च्या ऑर्बिटर पुढील सात वर्षे चंद्राची परिक्रमा करत माहिती पुरवणार आहे आणि हीच चांद्रयान-२ मोहिमेचे मोठे यश असल्याचे मानले जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज