अ‍ॅपशहर

नोकियाचा अँड्रॉयड टीव्ही बॉक्स येतोय, जाणून घ्या डिटेल्स

Nokia भारतात टेलिव्हिजन संबंधित एक नवीन प्रोडक्ट लवकरच लाँच करणार आहे. नोकियाचे हे प्रोडक्ट आपले ब्रँड लायसेन्सी फ्लिपकार्टसोबत मिळून आणणार आहे. हे प्रोडक्ट नोकियाचा अँड्रॉयड टीव्ही बॉक्स असणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jul 2020, 7:25 pm
नवी दिल्लीः नोकिया (Nokia) आता भारतात टेलिव्हिजन संबंधित एक नवीन प्रोडक्ट घेऊन येण्याची तयारी करीत आहे. नोकिया पॉवर युजरच्या एका रिपोर्टच्या माहितीनुसार, नोकियाचे हे प्रोडक्ट आपले ब्रँड लायसेन्सी फ्लिपकार्टसोबत मिळून आणणार आहे. हे प्रोडक्ट नोकियाचा अँड्रॉयड टीव्ही बॉक्स असणार आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, नोकिया आपला अँड्रॉयड टीव्ही बॉक्स ऑगस्टमध्ये भारतात लाँच करणार आहे. गेल्या महिन्यात इंडियन मार्केटमध्ये ४३ इंचाचा नोकियाचा स्मार्ट टीव्ही आणला होता. हे मॉडल बिल्ट इन क्रोमकॉस्ट आणि जेबीएल ऑडियो सोबत येतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nokia android tv box


वाचाः अॅपलचे एयरपॉड्स बजेटमध्ये नाही?, ट्राय करा हे स्वस्त इयरबड्स
नोकिया टीव्ही बॉक्समध्ये गुगल असिस्टेंट सपोर्ट
नोकियापॉवरयुजरच्या रिपोर्टनुसार, नोकिया अँड्रॉयड टीव्ही बॉक्स, अँड्रॉयड ९.० पॉवर्ड आहे. हा टीव्ही बॉक्स १०८० रिझॉल्यूशनचे आउटपूट ऑफर असेल. स्क्रीन्सला टेलिव्हीजनमध्ये कॉस्ट करण्यासाठी साठी हे क्रोमकास्ट सपोर्ट देईल. व्हाईस कंट्रोल्ड रिमोट फीचर साठी नोकिया च्या अँड्रॉयड टीव्ही बॉक्स मध्ये गुगल असिस्टेंट सपोर्ट मिळेल. आता या अँड्रॉयड टीव्ही बॉक्स संबंधी नोकियाने अधिकृत घोषणा केलेली नाही. फ्लिपकार्ट लवकरच या नवीन नोकिया अँड्रॉयड टीव्ही बॉक्सचा टीज करण्याची शक्यता आहे.



वाचाः रियलमी C11ची धमाल, २ मिनिटात विकले १.५ लाख फोन


मार्केटमध्ये यांच्याशी होईल टक्कर
नोकियाच्या अँड्रॉयड टीव्ही बॉक्सचे जे फीचर्स समोर आले आहेत. मार्केटमध्ये अॅमेझॉनच्या फायर टीव्ही स्टिक्स आणि गुगल क्रोमकास्ट आहे. एअरटेलने मागील वर्षी आपला एक्सस्ट्रीम अँड्रॉयड बॉक्स लाँच केला होता. जो स्ट्रीमिंग सर्विसेज आणि DTH चॅनल्सची ऑफर करतो. शाओमीने नुकताच आपला Mi Box 4K लाँच केला आहे. याची किंमत ३ हजार ४९९ रुपये आहे. Mi Box 4K अँड्रॉयड 9.0 वर चालतो. यात बिल्ट इन क्रोमकास्ट आणि 4K कंटेंट, HDR 10 सपोर्ट दिला आहे.

वाचाः मान्सून सेलः फ्रिज, एसी आणि वॉशिंग मशीनवर जबरदस्त ऑफर्स


नोकियाने लाँच केले दोन स्मार्ट टीव्ही
नोकियाने इंडियन मार्केटमध्ये आता आपले दोन स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये ५५ इंचाचा नोकिया स्मार्ट टीव्ही लाँच केला होता. याची किंमत ४१ हजार ९९९ रुपये आहे. हा स्मार्ट टीव्ही अँड्रॉयड ९.० टीव्ही ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. सुपीरीयर साउंड क्वॉलिटी साठी यात जेबीएल ऑडियो टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. तसेच यात २४ वॉट मल्टीपल स्पीकर्स दिले आहेत. टीव्हीत क्वॉड कोर प्रोसेसर आणि १६ जीबीचे ऑनबोर्ड स्टोरेज दिले आहे. नोकियाने ४३ इंचाच्या स्मार्ट टीव्हीची किंमत ३१ हजार ९९९ रुपये ठेवली आहे.

वाचाः सॅमसंगचा जबरदस्त फोन ३० जुलैला येतोय, पाहा किंमत

वाचाः रेडमी नोट ९ प्रो मॅक्सचा आज अॅमेझॉनवर फ्लॅश सेल

वाचाः सॅमसंग गॅलेक्सी M31s पासून रियलमी 6i पर्यंत, येताहेत स्वस्तातील स्मार्टफोन

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज