अ‍ॅपशहर

Nokia भारतात घेवून येतेय ३२ इंच आणि ५० इंच स्क्रीन TV

नोकिया भारतात स्मार्ट टीव्ही घेऊन येण्याची जोरदार तयारी करीत आहे. नोकिया सध्या दोन टीव्हीवर म्हणजेच ३२ इंच आणि ५० इंचाच्या टीव्हीवर काम करीत आहे. या दोन्ही साईजच्या टीव्ही भारतात लाँच करण्यात येतील.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Aug 2020, 9:35 pm
नवी दिल्लीः नोकिया आणि फ्लिपकार्टने देशात नुकतेच ४३ इंच, ५५ इंच आणि ६५ इंच स्क्रीन साईजमध्ये स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. एचएमडी ग्लोबलची मालकी असलेल्या नोकियाचे काही स्मार्ट टीव्ही भारतात आणू शकते. ३२ इंच आणि ५० इंच स्क्रीन साईजचे नोकिया स्मार्ट टीव्हीवर सध्या काम सुरू आहे. याला बीआयएस सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nokia smart tv


वाचाः जबरदस्त मेड इन इंडिया अॅप, फोटो क्लिक करुन बनवा पीडीएफ

नोकिया पॉवर युजरच्या एका रिपोर्टच्या माहितीनुसार, ३२ इंच नोकिया स्मार्ट टीव्हीला 32TAHDN मॉडल नंबरने लिस्ट करण्यात आले आहे. लिस्टिंगवरून टीव्ही फुल एचडी रिझॉल्यूशन स्क्रीन असल्याची माहिती समोर आली आहे. फुल एचडी रिझॉल्यूशन स्क्रीन सोबत येणारा नोकियाचा हा पहिला टीव्ही असणार आहे. तर 50TAUHDN मॉडल नंबरने लिस्टेड करण्यात आलेल्या आणखी एका दुसऱ्या नोकिया टीव्हीत UHD रेजॉलूशन डिस्प्ले असू शकतो.

वाचाः स्मार्टफोनच्या बॅटरी लाइफनं त्रस्त आहात?, या ट्रिक्स वापरा


३२ इंचाच्या नोकिया स्मार्ट टीव्ही कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्ट टीव्ही असू शकतो. ४३ इंच स्क्रीनचा स्मार्ट टीव्हीची किंमत ३१ हजार ९९९ रुपये आहे. या हिशोबाप्रमाणे ३२ इंच टीव्हीची किंमत २१ हजार ९९९ रुपयांच्या जवळपास असू शकते. तर ५० इंचाच्या टीव्हीची किंमत ३६ हजार ९९९ रुपये असू शकते. नोकियाच्या या टीव्हीत JBL स्पीकर्स, इंटेलिजेंट डिमिंग, DTS ट्रूसराउंड आणि डॉल्बी ऑडियो यासारखे फीचर्स दिले जावू शकतात. हे टीव्ही गुगलच्या अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टमसोबत येईल. यात गुगल असिस्टेंट व्हाईस कमांड इंटरफेस मिळणार आहे.

वाचाः सर्वात स्वस्त पोको फोन खरेदीची आज संधी, ऑफर्सही मिळणार


नोकियाच्या या स्मार्ट टीव्हीत 'Nokia PureCinema televisions' फॅमिलीचा सहभाग असेल. या सर्व नोकिया स्मार्ट टीव्ही 'Clear' आणि 'Pure' ब्रँडिंग सोबत येतील.

वाचाः रियलमी Narzo 10 फोनचा आज सेल, ऑफर्स मिळणार

वाचाः WhatsAppच्या या नवीन फीचर्समुळे चॅटिंगची मजा दुप्पट होणार

वाचाः HTCचा नवा E2 स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स

वाचाः जिओचे सर्वात फायद्याचे प्लान, वर्षभराची वैधता, ७३० GB डेटा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज