अ‍ॅपशहर

फिलिप्सने आणले दोन जबरदस्त स्मार्ट TV, पाहा किंमत

भारतीय मार्केटमध्ये अनेक कंपन्या आपापल्या जबरदस्त स्मार्ट टीव्ही लाँच करीत आहेत. आता फिलिप्स कंपनीने आपल्या दोन स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केल्या आहेत. या टीव्ही 4K LED स्मार्ट टीव्ही असून ते ५० इंच आणि ५८ इंचाचे आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jul 2020, 7:16 pm
नवी दिल्लीः Philips ने भारतात दोन जबरदस्त स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. या टीव्ही 4K LED स्मार्ट टीव्ही असून ते ५० इंच आणि ५८ इंचाचे आहेत. बॉर्डरलेस डिझाईन सोबत येणाऱ्या या दोन्ही स्मार्ट टीव्हीत डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी अॅटमॉस टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. नवीन एलईडी टीव्हीत HDR10+ सपोर्ट दिला आहे. अल्ट्रा रिझॉल्यूशन अपस्केलिंग टेक्नोलॉजी सोबत येणाऱ्या या टीव्हीच्या पॅनेलमध्ये ८० लाखांहून जास्त पिक्सल आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम philips 4k led smart tv


वाचाः सॅमसंगचा नवा फोन भारतात लाँच, किंमत ९९९९ ₹
किंमत किती
फिलिप्सने या दोन्ही टीव्हीला प्रीमियम सेगमेंट मध्ये लाँच केले आहे. ५० इंचाचा 4K स्मार्ट टीव्हीची किंमत १ लाख ५ हजार ९९० रुपये आहे. तर ५८ इंचाच्या नवीन 4K स्मार्ट टीव्हीची किंमत १ लाख १९ हजार ९९० रुपये आहे. दोन्ही टीव्हीला ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी केले जावू शकते.

वाचाः डोळ्यासारखा फिरणार फोनचा कॅमेरा, हटके फोन भारतात लाँच




फीचर्स आणि खास वैशष्ट्ये
स्क्रीन साईज शिवाय या दोन्ही टीव्हीचे फीचर्स आणि खास वैशिष्ट्ये एकसारखेच आहेत. मायक्रो डिमिंग फीचर या टीव्हीत देण्यात आले आहे. 4K LED पॅनल 16:9 च्या आस्पेक्ट रेशियो सोबत येतो. डॉल्बी व्हिजन आणि HDR10+ सपोर्ट या टीव्हीला आणखी प्रीमियम बनवतो. दोन्ही स्मार्ट टीव्ही Saphi ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतात. या टीव्हीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात आयकॉन बेस्ड मेन्यू ला एक बटन ने सर्व अॅक्सेस करण्याची सुविधा देण्यात आली आहे. टीव्हीत प्रसिद्ध व्हिडिओ स्ट्रिमिंग अॅप इनबिल्ट देण्यात आला आहे.

वाचाः iQOO ने लाँच केला स्वस्तातील स्मार्टफोन, पाहा किंमत

बॉर्डरलेस डिझाइनमुळे टीव्हीचा व्ह्यूईंग अँगल जबरदस्त आहे. कनेक्टिविटीसाठी मिराकास्ट सपोर्ट सोबत वाय फाय 802.11, इथरनेट (RJ-45) पोर्ट, हेडफोन जॅक, तीन HDMI पोर्ट आणि दोन यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत. साउंडला तुम्ही फाइव-बँड इक्वलाइजरच्या मदतीने तुमच्या सोईनुसार सेट करू शकता.

वाचाः एअरटेलची ऑफर, iPhone खरेदीवर ३६०० रुपयांची सूट

वाचाः Tata Sky चे जबरदस्त ब्रॉडबँड प्लान, 500GB पर्यंत डेटा मिळणार

वाचाः Reliance Jio AGM: जिओ सुरू करणार देशातील पहिले 5G नेटवर्क

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज