नवी दिल्ली: अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज या वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये, अनेक महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेने २०२२-२३ पासून ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून 'डिजिटल रुपया' सादर करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच, क्रिप्टोकरन्सीवर कर आकारणीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. वाचा: Aadhar card: क्रेडिट कार्ड सारखे बनेल तुमचे आधार कार्ड, फक्त ५० रुपयांमध्ये घरीच होईल डिलिव्हर
भारताचे डिजिटल चलन सुरू केले जाईल:
अर्थमंत्र्यांनी हे स्पष्ट केले आहे की, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून, भारतीय रिझर्व्ह बँक २०२२ सालापासून म्हणजेच या वर्षापासूनच देशाचे स्वतःचे डिजिटल चलन सुरू करेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सांगतात की, डिजिटल चलनाच्या आगमनाने, डिजिटल अर्थव्यवस्थेला खूप चालना मिळेल आणि चलन व्यवस्थापन प्रणाली देखील खूप स्वस्त होईल. या डिजिटल चलनाला आपल्या देशाची क्रिप्टोकरन्सी असेही म्हणता येईल.
बिटकॉइन कमाईवर ३० % कर:
अर्थसंकल्पात बिटकॉइनवर बंदी घालण्याबाबत काहीही भाष्य करण्यात आले नाही. परंतु, आतापासून बिटकॉइन इत्यादींच्या कमाईवर कर आकारण्यात येणार असल्याचे निश्चितपणे सांगण्यात आले आहे. बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणूकदारांसाठी हे आश्चर्यकारक आहे की, आभासी डिजिटल मालमत्तांवर ३० % कर आणि १ % TDS देखील या डिजिटल मालमत्तांच्या आभासी हस्तांतरणासाठी लागू होईल. जर क्रिप्टोकरन्सी एखाद्याला भेट म्हणून दिली असेल, तर भेटवस्तू प्राप्तकर्त्याला कर भरावा लागेल.
वाचा: Vivo Smartphone: ठरलं ! ९ फेब्रुवारीला लाँच होणार Vivo T1 5G, मिळू शकतात हे भन्नाट फीचर्स, पाहा डिटेल्स
वाचा: Google Search Tips: प्रत्येक प्रश्नाचे मिळेल अचूक उत्तर, फक्त Google सर्च करतांना वापरा या सोप्पी टिप्स
वाचा: Smartphone Apps: अँड्रॉइड युजर्ससाठी महत्वाचे ! फोनमधील की प्री-इंस्टॉल्ड Apps असे करा डिलीट, पाहा या ट्रिक्स