अ‍ॅपशहर

नवीन शोध; नॉनस्टॉप ५ दिवस चालणार मोबाइल बॅटरी

कितीही महागडा फोन घेतला तरी सर्व स्मार्टफोन युझर्ससाठी एक चिंतेचा विषय असतो आणि तो म्हणजे बॅटरी बॅकअप. वारंवार बॅटरी चार्ज करण्यासाठी वेळ नसतो आणि बॅटरी चार्ज केल्याशिवाय पर्यायही राहत नाही. पण संशोधकांनी एक नवं तंत्रज्ञान विकसित केलं आहे, ज्याच्या आधारे बॅटरी सलग पाच दिवस संपणार नाही. याच तंत्रज्ञानाच्या मदतीने इलेक्ट्रिक कारही पुन्हा चार्ज न करता १००० किमीपेक्षा जास्त चालवली जाऊ शकते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jan 2020, 5:14 pm
नवी दिल्ली : कितीही महागडा फोन घेतला तरी सर्व स्मार्टफोन युझर्ससाठी एक चिंतेचा विषय असतो आणि तो म्हणजे बॅटरी बॅकअप. वारंवार बॅटरी चार्ज करण्यासाठी वेळ नसतो आणि बॅटरी चार्ज केल्याशिवाय पर्यायही राहत नाही. पण संशोधकांनी एक नवं तंत्रज्ञान विकसित केलं आहे, ज्याच्या आधारे बॅटरी सलग पाच दिवस संपणार नाही. याच तंत्रज्ञानाच्या मदतीने इलेक्ट्रिक कारही पुन्हा चार्ज न करता १००० किमीपेक्षा जास्त चालवली जाऊ शकते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mobile battery


पॉर्न पाहताना हॅकर्सकडून व्हिडिओ रेकोर्डिंग

बॅटरीवर जो नवीन उपाय शोधण्यात आलाय, त्यात पारंपरिक लिथियम आयन कॉम्बिनेशनच्या ऐवजी नवीन कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत लिथियम आयन बॅटरीज स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि पेसमेकरसाठी वापरल्या जातात. याऐवजी संशोधकांनी अल्ट्रा-हाय क्षमतेसाठी लिथियम-सल्फर कॉम्बिनेशनचा वापर केला आणि आश्चर्यकारक परिणाम समोर आला.

'या' फोनवर व्हॉट्सअप कायमचं बंद होणार

ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातील संशोधकांनी हा प्रयोग केला. संशोधकांच्या टीमने सल्फर कॅथोड्सच्या डिझाईनला रि-कॉन्फिगर करुन यशस्वीपणे सध्याची बॅटरीतील कॉम्बिनेशनच्या जागी वापरुन पाहिलं. या कॉम्बिनेशनच्या मदतीने कोणत्याही अडथळ्याविना बॅटरीची क्षमता प्रचंड वाढली असल्याचं निरीक्षण संशोधकांनी नोंदवलं.

इलेक्ट्रिक कारमध्ये ट्रायल

‘यासाठी ऑस्ट्रेलिया सरकार आणि आंतरराष्ट्रीय उद्योजक भागीदारांकडून २.५ मिलियन डॉलर्सचा निधी मिळाला. या बॅटरीचा वापर यावर्षी इलेक्ट्रिक कार आणि ग्रिड्समध्ये केला जाणार आहे, ज्याने ऑस्ट्रेलियातील इलेक्ट्रिक कार मार्केटलाही मोठ्या प्रमाणात फायदा होईल’, अशी माहिती संशोधकांच्या टीममधील सदस्य मॅनक मजुमदार यांनी दिली.

यंदा बाजारात येणार 'हे' जबरदस्त स्मार्टफोन

नवीन बॅटरी पर्याय येत्या दोन ते चार वर्षात वापरासाठी उपलब्ध होऊ शकतो, असा अंदाज प्रकल्पाचे प्रमुख डॉ. महदोख्त शाईबनी यांनी व्यक्त केला. दरम्यान, संशोधकांनी सध्या निर्मिती पेटंटसाठी अर्ज दिला आहे. जागतिक बाजारात लिथियम-आयन बॅटरीसाठी पर्याय शोधला जात असतानाच हा नवा पर्याय समोर आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज