अ‍ॅपशहर

टाटा स्कायची सर्विस २ हजारांनी स्वस्त, ६ महिन्यांचे फ्री सब्सक्रिप्शन

टाटा स्कायने आपल्या युजर्संसाठी एक गुड न्यूज आणली आहे. टाटा स्कायची बिंज पल्स सर्विस आता स्वस्तात मिळणार आहे. ही सर्विस घेणाऱ्या युजर्संना २ हजार रुपये कमी द्यावे लागणार आहेत. तसेच या सेवे व्यतिरिक्त अन्य फायदेही मिळत आहेत. जाणून घ्या...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jun 2020, 3:15 pm
नवी दिल्लीः Tata Sky युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने Binge+ सर्विससाठी आणखी एक नवीन आणि धमाकेदार ऑफर आणली आहे. कंपनीने याची किंमत ५९९९ रुपयांवरून थेट ३९९९ रुपये केली आहे. तसेच कंपनीने बिंज प्लस सोबत ३ ते ६ महिन्यांपर्यंत ओटोटी कॉन्टेंटचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. या सर्विसमध्ये कंपनी सब्सक्रायबर्सला एकाच रिमोटमधून टीव्ही स्क्रीन आणि सॅटेलाईट ब्रॉडकास्ट चॅनेल आणि ओटीटी कॉन्टेंट पाहण्यासाठी सुविधा देत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tata sky  binge+



वाचाः बॅटरीतून निघाला धूर आणि जळायला लागला फोन


गुगल असिस्टंट सपोर्ट

टाटा स्काय बिंज प्लस वरून युजर्संना कोणताही शो, मूव्ही, म्युझिक किंवा गेमचे आपल्या लॅपटॉप किंवा मोबाइल फोनवर एन्जॉय करता येऊ शकणार आहे. त्याला बिल्ट इन क्रोमकॉस्ट फीचरच्या मदतीने टीव्हीवर पाहता येऊ शकते. टाटा स्कायच्या या ऑफर्सचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ही सेवा गुगल असिस्टेंट सोबत येते. गुगल असिस्टेंट सपोर्ट मुळे प्ले स्टोरवरील खूप सर्व गेम्स आणि अॅपची मजा घेता येवू शकते.

जुन्या टीव्हीसोबतही करणार काम

टाटा स्काय बिंज प्लस एक नेक्स्ट जनरेशन अँड्रॉयड सेट टॉप बॉक्स आहे. एचडीएमआय आऊटपूट मुळे हे 4K, HD, LED, LCD किंवा प्लाज्मा टीव्हीसोबत कनेक्ट करता येऊ शकते.


वाचाःजिओचे २०२० मधील बेस्ट रिचार्ज प्लान, १२९ रुपयांपासून सुरू


या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन
३९९९ रुपयांच्या टाटा स्काय बिंज प्लस सोबत कंपनी ६ महिन्यांचे डिज्नी प्लस हॉटस्टार, हंगामा, शेमारू आणि इरॉस नाऊ चे सब्सक्रिप्सन देत आहे. तसेच बॉक्ससोबत युजर्संना कोणत्याही एक्स्ट्रा कॉस्ट शिवाय ३ महिन्याचे अॅमेझॉन प्राईम व्हिडिओचे सब्सक्रिप्शन देत आहे.

वाचाः फोनचा कॅमेरा आणि मायक्रोफोनमधून युजर्संची हेरगिरी, सरकारकडून वॉर्निंग

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज