अ‍ॅपशहर

गुगल मॅप्स करणार कोव्हिड -19 लसीकरण केंद्र शोधण्यात मदत

कोव्हिड -19 चे लसीकरण संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर सुरु झाले आहे. करोना पासून स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा बचाव करायचा असेल तर लस घेणे आवश्यक आहे. लस घ्यायची असल्यास याकरिता लसीकरण केंद्र शोधण्यात गूगल सर्च आणि मॅप्सची मदत तुम्हाला घेता येणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Apr 2021, 2:22 pm
केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोनाचा हाहाकार सुरु आहे. अनेक लोकांचे प्राण या भयानक महामारीने घेतले आहे. अशात करोना होऊ नये याकरिता योग्य ती काळजी घेण्याचे आणि लस घेण्याचे आवाहन देखील सतत करण्यात येत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु आहे. यात आता गूगल मॅप्सच्या सहाय्याने देशातील लसीकरण केंद्र शोधता येणार आहे. यामुळे जे लोक गूगल सर्च व मॅप्स वापरतात त्यांना याचा अधिक उपयोग होणार आहे. असे एम. डी . एमएच गूगलचे मुख्य आरोग्य अधिकारी कॅरन दिसलवो यांनी त्यांच्या औपचारिक ब्लॉग पोस्ट मध्ये म्हटले आहे. कोव्हिड-19 पासून जोपर्यंत प्रत्येक जण सुरक्षित नाही, तोपर्यंत कुणीच सुरक्षित नाही. या अशात प्रत्येकाला लस उपलब्ध करून देणे हे आव्हानात्मक असले तरी आवश्यक आहे. आम्ही आमच्याकडून शक्य ते प्रयत्न करू असेही त्यांनी ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 82094820
सौजन्य Gadgets Now

सौजन्य Gadgets Now


ज्यांना लस घ्यायची आहे ते कुठे राहतात त्या ठिकाणापासून लसीकरणाचे ठिकाण किती दूर आहे. त्यांना किती अंतर जावे लागणार आहे व यात त्यांचा किती वेळ जाणार आहे? हे देखील महत्वाचे आहे. पण, जर व्यवस्थित इंटरनेट कनेक्शन हे शोधणे अधिक सहज होणार आहे. गूगलचे कोव्हिड व्हॅक्सिनेशन गूगल सर्चवर दाखल झाले असून याकरिता तुम्हालासर्चमध्ये जाऊनन जवळचे लोकेशन सर्च करावा लागेल. आम्ही देखील गुगल मॅप ववर संबंधित माहिती शोधली असता समाधानकारक माहिती मिळाली. करोना संदर्भातील इतर माहिती देखील तिथे उपलब्ध आहे. ' व्हेअर टू गेट इट ' या पर्याया वर क्लिक केले असता तुम्हाला जवळील ठिकाणाची माहिती मिळेल. तसेच गूगल सर्च ओव्हरव्ह्यू मध्ये भारतातआता पर्यंत किती लसीकरण झाले, किती लोकांना पूर्ण डोज मिळाले, किती लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले इत्यादी माहिती मिळेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज