अ‍ॅपशहर

Ganesh Utsav 2022: तुम्ही पाहिली का चॉकलेटची गणेश मुर्ती?

Ganesh Utsav 2022 : बुधवारी ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थीनिमीत्त सर्वीकडे गणेशाचे आगमन झाले आहे. यंदा सर्वीकडे गणेश मुर्ती तसेच तेथील देखावा हे आकर्षण ठरावे म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे. अशीच एक आकर्षण ठरणारी मुर्ती म्हणजे चॉकलेटची गणेश मुर्ती आहे, जाणून घेऊया कुठे आहे मुर्ती आणि कशी घडली मुर्ती.

Authored byप्रियंका वाणी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Sep 2022, 2:03 pm
गणेशोत्सवाचा आज तिसरा दिवस असून, सर्वीकडे बाप्पासोबत जल्लोषात गणेश उत्सव साजरा होत आहे. या दरम्यान जागोजागी गणपती बाप्पा स्थापन करण्यात आले आहेत. या विविध ठिकाणी विविध सजावट, विविध थीम आणि आगळे वेगळे स्वरूपाची गणेश मुर्ती विराजमान आहेत. गणेश उत्सवात वेगवेगळ्या आकर्षणात आता आकर्षीत झालेली मुर्ती म्हणजे आग्रा येथेल चॉकलेट बाप्पा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ganpati Bappa Idol Made By Chocolate
चॉकलेटपासून बनवलेली गणेश मुर्ती


आग्रा येथील नेहरू नगरात स्थित असलेली गणेश मुर्ती चॉकलेटची बनवण्यात आली आहे. भगत हलवाई यांच्या येथे ८० किलो चॉगलेटच्या सहाय्याने ही मुर्ती बनवण्यात आली असून, ही मुर्ती ३ फुटाची आहे. लोकांना भक्तांना आणि विशेष म्हणजे लहान मुलांना आकर्षीत होईल अशी ही मुर्ती आहे.

Ganesh Festival 2022: गणपती बाप्पास प्रिय दुर्वा 'असा' वापरा, होतील सर्व विघ्न दूर

आपल्या येथे पिओपीच्या गणेश मुर्ती बनवण्यात येतात. परंतू या विसर्जन केल्यानंतर पाण्यात खूप काळ तशीच राहते आणि पाणी देखील दुशीत होते तेव्हा शाळू मातीच्या गणेश मुर्ती बनवल्या गेल्या पाहिजे आणि त्याच मुर्ती स्थापन करायला हव्या या हेतून आता अनेकजण शाळूमातीच्या गणेश मुर्ती देखील घरी आणतात. याच विचारातून भगत हलवाईवाल्यांनी यंदा ही शक्कल लढवली आणी चॉकलेटची गणेश मुर्ती स्थापन केली असे सांगितले जात आहे.

एका आठवड्याच्या कालावधीत ही मुर्ती बनवली गेली असून, चॉकलेट वितळू नये म्हणून मुर्तीला १६ डिग्री सेल्सियस तापमानात ठेवण्यात आले आहे. चॉकलेटची ही मुर्ती फूड कलर ने सजवण्यात आली आहे. तसेच, यावर सोनेरी रंगाचा मुलामा चढवण्यात आला आहे.
Ganesh Chaturthi 2022 : घ्या चिंतामणीचे दर्शन, भाविकांच्या तुंबळ गर्दीत आगमन सोहळा संपन्न
लेखकाबद्दल
प्रियंका वाणी
महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज