अ‍ॅपशहर

Ganpati Visarjan 2022: या भजनात गणेश विसर्जन होईल उत्साहात

Ganpati Bhajan and Aarti in Marathi : "मोरया...मोरया... गणपती बाप्पा मोरया"... "एक दोन तीन चार... गणपतीचा जयजयकार"... "गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या" अनेक भजन आरत्या, नाशीक ढोल, मुंबईचा मान, पुण्याची साथ घेत गणेश विसर्जनाचा उत्साह पार पडतो. पाहूया गणेश विसर्जनावेळी कोणकोणते भजन गायले जातात...

Edited byप्रियंका वाणी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Sep 2022, 12:52 pm
पाहता पाहता सन २०२२ मधील गणेशोत्सव आता सांगतेकडे आला आहे. येत्या चार दिवसांनी गणपतीला निरोप द्यावा लागेल. यंदा देशभरात गणेशोत्सव अगदी जल्लोषात, उत्साहात, मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. "मोरया...मोरया... गणपती बाप्पा मोरया"... "एक दोन तीन चार... गणपतीचा जयजयकार"... "गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या" अशा घोषणांनी विसर्जन मिरवणुकेत दुमदुमणारा आवाज सर्वांना ज्ञात आहे. शुक्रवार ९ सप्टेंबर २०२२ ला होणाऱ्या विसर्जनावेळी देखील हा जयघोष पून्हा होईल आणि गणेशाला निरोप दिला जाईल. यासोबत अनेक भजन आरत्या, नाशीक ढोल, मुंबईचा मान, पुण्याची साथ घेत गणेश विसर्जनाचा उत्साह पार पडतो. पाहूया गणेश विसर्जनावेळी कोणकोणते भजन गायले जातात...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ganpati visarjan bhajan in marathi ganpati visarjan aarti
Ganpati Visarjan 2022: या भजनात गणेश विसर्जन होईल उत्साहात


गणेश विसर्जन भजन
'विसर्जनाची व्यथा मनाची सांगू केसी कुणा घरामधूनी जाताना मखर वाटे सुना'
'हे गजवदन वक्रतुंड महाकाय'
'बाप्पा मोरया रे'
'सुखकर्ता तू'
'बाप्पा चालले रे गावाला'
'गणनायका'
'बाप्पा मोरया रे'
'देव गणपती पूजेला'
'पुढच्या वर्षी लवकर या'

वेदशास्त्रांमाजी तूं मंगलमूर्ती

वेदशास्त्रांमाजी तूं मंगलमूर्ती। अगणित महिमा तुझा कल्याण स्फूर्ती॥
भक्तांलागी देसी विद्या अभिमत ती। मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती ॥१॥

जय देव जय देव जय मोरेश्वरा। तुझा न कळे पार शेषा फणिवरा ॥ध्रु०॥

पुळ्यापश्ये नांदे महागणपती। माघ चतुर्थीला जनयात्रे येती।।

जें जें इच्छिति तें तें सर्वही पावती। गणराजा मज बाळा द्यावी अभिमती ॥२॥

॥ जय देव जय देव०॥

एकवीस दुर्वांकुरा नित्ये नेमेसी। आणूनि जे अर्पिती गणराजयासी॥
त्याचे तू भवबंधन देवा चुकविसी। विठ्ठलसुत हा ध्यातो तुझिया चरणासी॥ जय देव जय देव जय मोरेश्वरा॥३॥

॥ जय देव जय देव०॥

नाना परिमळ दूर्वा

नाना परिमळ दूर्वा शेंदूर शमिपत्रें । लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।।
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे । अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।।

जय देव जय देव जय मंगलमूर्ती । तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ।। ध्रु० ।।

तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती । त्यांची सकलही पापे विघ्नेंही हरती ।।

वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती । सर्वहि पावती अंती भवसागर तरती ।। २ ।।

॥ जय देव जय देव०॥

शरणांगत सर्वस्वें भजती तव चरणी । कीर्ती तयांची राहे जोवर शशितरणि ।।
त्रैलोक्यी ते विजयी अदभूत हे करणी । गोसावीनंदन रत नामस्मरणी ।। ३ ।।

॥ जय देव जय देव०॥
लेखकाबद्दल
प्रियंका वाणी
महाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज