Development of women and children in rural areas part 3
ग्रामीण क्षेत्रातील महिला व मुलांचा विकास –भाग ३
सक्षमीकरणाची संकल्पना -
महिला या घटकाच्या व विशेष ग्रामीण महिला सक्षमीकरणाचा विचार करण्यापूर्वी सक्षमीकरण ही संकल्पना समजून घेणे उचित ठरते. जागतिक बँकेच्या मते सक्षमीकरण म्हणजे लोकांच्या निवड करण्याच्या संधीमध्ये वाढ करणे, लोकांच्या आयुष्यावर प्रभाव पाडणाऱ्या संस्थाचे उत्तरदायीत्व निश्चित करणे, त्यामध्ये सहभाग होणे, त्यावर प्रभाव पाडणे नियंत्रण ठेवणे होय.
महिला सक्षमीकरणाची परिभाषा -
स्त्री- पुरुष विषमतेला खतपाणी घालणारी परंपरागत समाज रचना व समाज धारणेत बदल घडवून आणणारी अशी प्रकिया आहे की, ज्यातून महिला समता निश्चित होते आणि हाच महिला सक्षमीकरणाचा आधार मानला गेलेला आहे. या आशयावरुन आपणास असे लक्षात येते की, महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत लिंगभाव समता, महिलाचा निर्णय प्रक्रियेत सहभाग विकासाची समान संधी हे घटक महत्त्वपूर्ण आहेत.
वाचाः ग्रामीण क्षेत्रातील महिला व मुलांसाठी केंद्राने आणलेल्या 'या' योजनांची माहिती तुम्हाला असायलाच पाहिजे!
ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात केंद्र शासनाची भूमिका -
ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरासाठी केंद्र शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात त्यातील काही योजना या पूर्णतः ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी समर्पित आहेत. यातील अनेक योजना या सध्या अस्तित्वात नाहीत मात्र तरीही त्याचे महिलांच्या सबलीकरणातील योगदान महत्त्वपूर्ण आहे, त्या योजना खालील प्रमाणे -
८ राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक -
कृषी व ग्रामीण गैर कृषी विभागाला वित्त पुरवठा करुन ग्रामीण भारताचा विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने भारत सरकारने १२ जुलै १९८२ मध्ये नाबार्ड या ग्रामीण विकास समर्पित शिखर बँकेची स्थापना केली. नाबार्ड मार्फत अनेक कार्यक्रम राबविले जातात. जसे डेअरी उद्योजकता विकास योजना, कृषी चिकित्सा व कृषी व्यवसाय केंद्र योजना राष्ट्रीय पशुसंवर्धन अभियान, व्याज अनुदान योजना इ. नाबार्ड मार्फत शेती क्षेत्र, लघू उद्योग, ग्रामीण व कुटीरोद्योग, हस्तोद्योग या क्षेत्राना गुंतवणुक व उत्पादन कार्यासाठी वित्त पुरवठा केला जातो. नाबार्डचे योगदान ग्रामीण महिलांच्या विकासात महत्त्पूर्ण आहे.
वाचाः 'या' वयोगटातील मुलींना मिळू शकते मोफत सायकल; केंद्र सरकारने आणलीये नवी योजना

- एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम -
- ग्रामीण क्षेत्रातील महिला व बालकांचा विकास -
- महिला प्रषिक्षण आणि रोजगार कार्यक्रमांना पाठबळ देणे -
- स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना -
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-
- राष्ट्रीय महिला कोश -
- ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था -