अ‍ॅपशहर

९५ लाख रु., २ गाड्या, २ बंदुका; योगींची संपत्ती!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे ९५ लाख रुपये आणि सोन्याची कुंडले, एक रुद्राक्षांची सोन्याची माळ याशिवाय काहीही नाही. उत्तर प्रदेशचे दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र करोडपती आहेत. योगींकडे संपत्तीशिवाय दोन गाड्या आणि एक रिव्हॉल्व्हर आणि एक रायफलही आहे! उत्तर प्रदेश विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी योगींनी अर्ज दाखल केला आहे. त्यातील शपथपत्रात ही माहिती आहे.

Maharashtra Times 6 Sep 2017, 11:22 am
मटा ऑनलाइन वृत्त । लखनऊ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yogi


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे ९५ लाख रुपये आणि सोन्याची कुंडले, एक रुद्राक्षांची सोन्याची माळ याशिवाय काहीही नाही. उत्तर प्रदेशचे दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र करोडपती आहेत. योगींकडे संपत्तीशिवाय दोन गाड्या आणि एक रिव्हॉल्व्हर आणि एक रायफलही आहे! उत्तर प्रदेश विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी योगींनी अर्ज दाखल केला आहे. त्यातील शपथपत्रात ही माहिती आहे.

योगींची कुंडले २० ग्रॅम वजनाची तर गळ्यात १०० ग्रॅम सोन्याने मढलेली एक रुद्राक्षांची माळ आहे. योगींकडे जिथे इतकी कमी संपत्ती असताना उत्तर प्रदेशचे दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र कोट्यधीश आहेत. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे ७ कोटी ४३ लाखांची संपत्ती तर उपमुख्यमंत्री दिनेश मौर्य यांच्याकडे २ कोटी रुपयांची ९२ लाख रुपये इतकी आहे.

योगींची संपत्ती -

एकूण संपत्ती - ९५ लाख ९८ हजार रुपये

अचल संपत्ती - शून्य

चल संपत्ती - ९५ लाख ९८ हजार रुपये

वाहन - दोन गाड्या (फॉर्च्युनर आणि इनोवा)

हत्यार - रिव्हॉल्वर आणि रायफल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज