अ‍ॅपशहर

देशभरात शिक्षकांची ८४ हजार पदे भरणार

सरकारकडून रिक्त पदांची भरती करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. याअंतर्गत देशभरात शिक्षकांची ८४ हजार पदे भरण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आज ट्विटरवरून दिली आहे. ही पदे भरण्यासाठी लवकरच जाहिरात काढली जाणार असल्याचेही या ट्विटमधून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Sep 2019, 5:19 pm
नवी दिल्लीः सरकारकडून रिक्त पदांची भरती करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. याअंतर्गत देशभरात शिक्षकांची ८४ हजार पदे भरण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आज ट्विटरवरून दिली आहे. ही पदे भरण्यासाठी लवकरच जाहिरात काढली जाणार असल्याचेही या ट्विटमधून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम techers


तरुणांसाठी देशभरात शिक्षकांची पदे भरली जाणार आहे. सोमवारी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक ट्विट करून ही माहिती दिली आहे. देशभरात साधारणपणे एक लाख पदे भरण्यात येणार आहेत. यात केंद्र सरकारमधील १४ हजार पदांचा तर ८४ हजार राज्य सरकारच्या अखत्यारित पदांचा समावेश आहे. अन्य रिक्त जागांसाठी राज्यांशी चर्चा सुरू असल्याचेही केंद्र सरकारने म्हटले आहे. शिक्षकांच्या १४ हजार पदांच्या भरतीसाठी याआधीच जाहिरात निघाली आहे. तर काही दिवसांत देशभरातील ८४ हजार शिक्षकांच्या पदासाठी जाहिरात निघणार आहे. या जागा देशभरातील विविध भागात भरल्या जाणाऱ्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज