अ‍ॅपशहर

हिमस्खलनात महाराष्ट्राचे तीन वीर मृत्युमुखी

काश्मीरच्या गुरेज सेक्टरमधील हिमस्खलनाच्या दोन घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या जवानांची संख्या १४ झाली असून त्यात महाराष्ट्राच्या तीन सुपुत्रांचा समावेश आहे. अकोल्याचे शिपाई आनंद गवई आणि संजू खंडारे, तसंच बीडचे विकास समुद्रे यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

Maharashtra Times 27 Jan 2017, 3:53 pm
मटा ऑनलाइन वृत्त । श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 soldiers killed after avalanches hit gurez sector 3 jawans from maharashtra
हिमस्खलनात महाराष्ट्राचे तीन वीर मृत्युमुखी

काश्मीरच्या गुरेज सेक्टरमधील हिमस्खलनाच्या दोन घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या जवानांची संख्या १४ झाली असून त्यात महाराष्ट्राच्या तीन सुपुत्रांचा समावेश आहे. अकोल्याचे शिपाई आनंद गवई आणि संजू खंडारे, तसंच बीडचे विकास समुद्रे यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

दोन दिवसांपूर्वी, बांदीपुरा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ गुरेज सेक्टरमध्ये हिमपर्वताचा एक विशाल भाग लष्कराच्या शिबिरावर कोसळला होता. त्यामुळे बर्फाखाली अनेक सैनिक अडकले होते. या दुर्घटनेनंतर जवानांच्या तुकडीने युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेतलं होतं. त्यात सात जणांना वाचवण्यात ते यशस्वी झाले होते. पण कालपर्यंत १० जवानांचे मृतदेहही सापडले होते. आज हा आकडा १४ वर गेला आहे. मृत्युमुखी पडलेल्या जवानांची ओळखही पटली असून तीन जण महाराष्ट्राचे वीर आहेत. ही बातमी सगळ्यांच्याच मनाला चटका लावून जाणारी आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज