अ‍ॅपशहर

महिलांच्या 'खासगीपणा'त डोकावणारा ताब्यात

बलात्कार, छेडछाड व महिलांच्या पाठलागाच्या घटना समोर येत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरातील महिलांचे खासगी आयुष्यातील क्षण लपूनछपून पाहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Apr 2018, 3:55 pm
बेंगळुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम piping-tom


बलात्कार, छेडछाड व महिलांच्या पाठलागाच्या घटना समोर येत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरातील महिलांचे खासगी आयुष्यातील क्षण लपूनछपून पाहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला बेंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास गीताजंली नगरमध्ये ही घटना उघडकीस आली. मैसूर रोड येथील गीतांजली नगरमध्ये एका महिलेने बाल्कनीत लपलेल्या १६ वर्षांच्या मुलाला पकडले. त्यावेळी आपल्याला काहीजण मारहाण करत असल्यामुळं इथं लपून राहिलो असल्याचं सांगत मुलानं आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला.

या महिलेनं मुलाविषयी पोलिसांकडं तक्रार केल्यानंतर पोलीस चौकशीत वेगळीच माहिती समोर आली. पोलिसांसमोरदेखील या मुलाने अगदी तीच गोष्ट सांगितली. मात्र, पोलिसांना त्याच्या बोलण्यात काही विसंगती वाटल्यामुळे संशय आला. अखेर अधिक चौकशी केल्यानंतर मुलानं आपला गुन्हा कबूल केला. रात्री-अपरात्री हा मुलगा एखाद्याच्या घरात, बाल्कनीत किंवा बाथरूमच्या मागे लपून राहत असे आणि संधी मिळताच महिलांच्या बेडरूम व बाथरूममध्ये डोकावून लपून पाहत असे. त्याला या प्रकाराची सवयच लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुलगा अल्पवयीन असल्यामुळं पोलीस अधिकाऱ्यांनी त्याचं समुपदेशन केलं. त्याच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलवून संपूर्ण प्रकाराची माहिती देण्यात आली. मुलाकडं लक्ष देण्याच्या सूचना पालकांना दिल्या आहेत, असं पोलिसांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज