अ‍ॅपशहर

पैशासाठी २,२०० महिलांची गर्भाशयं काढली!

ग्रामीण भागातील महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन पैशाच्या हव्यासापायी २,२०० महिलांची गर्भाशयं काढून घेणारी कर्नाटकातील चार रुग्णालयं विनापरवाना सुरू असल्याचं उघड झालं आहे. गंभीर गुन्हे करूनही राजरोस सुरू असलेल्या या रुग्णालयाविरोधात हजारो पीडित महिला सोमवारी रस्त्यावर उतरल्या. या रुग्णालयातील डॉक्टर व व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल करून ही रुग्णालयं कायमची बंद करावीत, अशी मागणी या महिलांनी केली आहे.

Maharashtra Times 7 Feb 2017, 4:10 pm
मटा ऑनलाइन वृत्त ।बेंगळुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2200 kalaburagi women lose uterus to doctors greed
पैशासाठी २,२०० महिलांची गर्भाशयं काढली!

ग्रामीण भागातील महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन पैशाच्या हव्यासापायी २,२०० महिलांची गर्भाशयं काढून घेणारी कर्नाटकातील चार रुग्णालयं विनापरवाना सुरू असल्याचं उघड झालं आहे. गंभीर गुन्हे करूनही राजरोस सुरू असलेल्या या रुग्णालयाविरोधात हजारो पीडित महिला सोमवारी रस्त्यावर उतरल्या. या रुग्णालयातील डॉक्टर व व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल करून ही रुग्णालयं कायमची बंद करावीत, अशी मागणी या महिलांनी केली आहे.

गरज नसताना ग्रामीण भागातील महिलांच्या गर्भपिशव्या काढून टाकणारे एक रॅकेट २०१५ मध्ये उघडकीस आले होते. पोटदुखी व सांधे दुखीसाठी डॉक्टरांकडे येणाऱ्या महिलांना गर्भशयाचा गंभीर आजार किंवा कर्करोग झाल्याची भीती दाखवून त्यांचे गर्भशय काढण्याचा सल्ला देण्यात येत होता. लंबानी व दलित समाजातील २,२०० महिलांची गर्भाशयं काढून टाकण्यात आल्याचं चौकशीत पुढं आलं होतं.

आरोग्य विभागाच्या चौकशी अहवालानुसार, 'अनेक महिला ओटीपोटातील दुखणं आणि पाठदुखीसाठी डॉक्टरांच्या संर्पकात होत्या. प्रथम त्यांना अल्ट्रासाऊंड सोनोग्रॅफी करण्यासाठी सांगितले जाई व तात्पुरतं औषध देण्यात येई. काही काळानंतर महिलेला काही फरक नाही पडला तर गर्भाशयाच्या कर्करोगाची भीती दाखवून तिची गर्भपिशवी काढून टाकण्याचा सल्ला दिला जाई. अशा अनेक घटना समोर आल्यानंतर हे रॅकेट समोर आले होतं. त्यानंतर आरोग्य विभागानं या रुग्णालयांचे परवाने रद्द केले होते. मात्र, पुढं काहीच ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळं ही रुग्णालयं आजही सुरू असून आरोपी डॉक्टर उजळ माथ्यानं व्यवसाय करत आहेत.

या विरोधात कालबुरागी येथे सोमवारी अनेक स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांसह पीडित महिला रस्त्यावर उतरल्या. त्यांनी पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली. कर्नाटकातील खासगी वैद्यकीय कायदा अधिक कडक करण्याची मागणी या महिलांनी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज