अ‍ॅपशहर

अभिनेत्रींच्या बनावट फोटोवरून पॉर्न वेबसाइट

दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या बनावट फोटोचा वापर करून पॉर्न वेबसाईट चालवणाऱ्या एका तरुणाला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. दासारी प्रदीप (वय २४) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

Maharashtra Times 10 Oct 2017, 10:30 am
मटा ऑनलाइन वृत्त । बेंगळुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 year young managing four soft porn websites with morphed images of telugu actors arrested
अभिनेत्रींच्या बनावट फोटोवरून पॉर्न वेबसाइट


दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या बनावट फोटोचा वापर करून पॉर्न वेबसाईट चालवणाऱ्या एका तरुणाला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. दासारी प्रदीप (वय २४) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

'मुव्ही आर्टिस्ट असोसिएशन'ने गेल्या आठवड्यात जवळपास २० पॉर्न वेबसाइट्सविरुद्ध हैदराबाद सीआयडी पोलिसांकडे तक्रार केली होती. सॉफ्ट पॉर्न वेबसाइट्स टॉलिवूड अभिनेत्रींच्या बनावट फोटोचा वापर करीत असल्याचं असोसिएशननं तक्रारीत म्हटलं होतं. ज्या २० पॉर्न वेबसाइट्सविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती त्यापैकी ४ वेबसाइट्स प्रदीप चालवत होता', अशी माहिती तेलंगाना सीआयडीचे पोलीस अधीक्षक यू. राममोहन यांनी सांगितलं.

अतिरिक्त मिळकत (इन्कम) मिळण्याच्या हेतूनं प्रदीपनं वेबसाइट्स सुरू केली होती. पैसा कमवण्यासाठी शॉर्ट कटचा मार्ग प्रदीपनं अवलंबला होता. परंतु तो आता त्याच्या चांगलाच अंगलट आला आहे. प्रदीप हा पेइंग गेस्ट म्हणून राहत होता व तेथूनच तो वेबसाइट्सचं काम पाहायचा. दरम्यान, असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी राजा, माजी अध्यक्ष एम. मुरली मोहन आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा यांनी गेल्या आठवड्यात सीआयडीकडे यासंदर्भात तक्रार केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज