अ‍ॅपशहर

बलात्कारातून जन्मलेल्या मुलाने २७ वर्षानंतर घेतला आईचा शोध; जन्मदात्या बापाला घडवली जन्माची अद्दल

Shahjahanpur Rape Case: उत्तर प्रदेशमध्ये चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशी एक घटना घडली आहे. २८ वर्षांपूर्वी झालेल्या एका घटनेत पिडीत महिलेला आता न्याय मिळाला आहे. मुलाने आईला मिळवून दिला न्याय

Authored byमानसी क्षीरसागर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Aug 2022, 11:18 am
शाहजहांपूरः लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या एका महिलेला तब्बल २८ वर्षांनी न्याय मिळाला आहे. विशेष, म्हणजे तिच्या मुलानेच तिला हा न्याय मिळवून दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये घडलेली ही घटना एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी मुलाने केलेला संघर्ष डोळ्यात पाणी आणणारा आहे. (son helps trace mom’s rapists)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Shahjahanpur Rape Case


घटना घडली तेव्हा पीडितेचे वय १२ वर्ष होते. महिलेवर बलात्कार झाल्यानंतर त्यातून तिने एका मुलाला जन्म दिला. २७ वर्षानंतर आपल्या जन्मदात्या वडिलांचे दुष्कृत्य समजल्यावर मुलाने आईला आरोपी वडिलांविरोधात तक्रार दाखल करण्याचे हिम्मत दिली. त्यानंतर कायदेशीर लढ्यानंतर आरोपीला शिक्षा मिळाली आहे.

वाचाः तीन दिवसांपासून प्रियकर- प्रेयसी हॉटेलबाहेर पडलेच नाहीत; रुमचा दरवाजा उघडताच समोर दिसले भयानक दृश्य
काय आहे संपूर्ण प्रकरण

१९९४साली पिडीत महिला बहिण व तिच्या पतीसह एका मोहल्ल्यात राहत होती. तिच्या बहिणीचे पती सरकारी नोकरी करत होते तर बहिण एका शाळेत शिक्षिका होती. दोघेही घरी नसताना एक दिवस मोहल्ल्यातील नकी हसन उर्फ ब्लेडी ड्रायवरने घरात घुसून महिलेवर अत्याचार केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचा भाऊ गुड्डूने पिडीतेवर बलात्कार केला. त्यानंतर महिला गर्भवती राहिली व तिने एका मुलाला जन्म दिला.

वाचाः वडिलांचे क्रांतीकारी पाऊल; लेकीच्या पहिल्या मासिक पाळीचा महोत्सव साजरा करणार, पत्रिकाही वाटल्या

मुलाच्या जन्मानंतर त्याला हरदोईतील एका दाम्पत्याला दत्तक देण्यास तिला भाग पाडले. व नंतर महिलेचे लग्न गाजीपूर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत करुन दिले. मात्र, लग्नाच्या दहा वर्षानंतर पीडितेच्या पतीला तिच्या भुतकाळाबद्दल समजलं. त्यानंतर त्याने तिच्याशी फारकत घेत संबंध तोडले.

पिडीतेच्या दत्तक दिलेल्या मुलाने २७ वर्षानंतर त्याच्या खऱ्या पालकांविषयी माहिती काढायला सुरुवात केली. तेव्हा त्याला त्याच्या आईचे खरे नाव माहिती झाले. त्यानंतर त्याने आईची भेट घेतली. आईची भेट घेतल्यानंतर त्याला तिच्यासोबत घडलेल्या घटनांबाबत माहिती मिळाली. तेव्हा तरुणाने पिडीतेला पोलिसात तक्रार करण्यास सांगितले व ही कोस कोर्टात उभी राहिली. दोन आरोपींविरोधात पोलिस ठाण्यात सामहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. तसंच, न्यायालयात आरोपी, पीडित महिला आणि तिच्या मुलाची डीएनए चाचणीही करण्यात आली होती.

वाचाः तीन वर्षांपासून १६ वर्षांच्या मुलासोबत घडत होता किळसवाणा प्रकार; पालकांना समजताच बसला धक्का
लेखकाबद्दल
मानसी क्षीरसागर
मानसी क्षीरसागर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजीटल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | डिजीटल पत्रकारितेचा सहा वर्षांचा अनुभव आहे | सामाजिक, राजकीय, मनोरंजन याबरोबरच माहितीविषयक आणि विश्लेषणात्मक बातम्यांचे कव्हरेज करण्याची विशेष आवड... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज