अ‍ॅपशहर

परदेशातून परतलेत ४० लाख लोक: आरोग्यमंत्री

गेल्या काही दिवसांमध्ये परदेशातून १४ लाख नागरिक भारतात परतले असून त्यांच्यावर सरकारची करडी नजर असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. या लोकांनी घरातून बाहेर पडू नये, असे त्यांना आवाहन केले असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Mar 2020, 4:21 pm
नवी दिल्ली: देशात करोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेत ३२ राज्यांमध्ये लाकडाऊन किंवा संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. आता पर्यंत देशभरात एकूण ५२५ लोकांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यांमध्ये परदेशातून आलेल्या लोकांची संख्या अधिक आहे. गेल्या काही दिवसांमध्ये परदेशातून फिरून आलेल्या लोकांची संख्या १४ लाख इतकी आहे. सरकार या लोकांवर विशेष लक्ष ठेवून आहे. परदेशातून आलेल्या लोकांनी घरातच राहावे अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम corona


आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज, मंगळवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन देशातील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर त्यांनी मागील काही दिवसांमध्ये परदेशातून एकूण १४ लाख लोक आल्याची माहिती दिली. या बरोबरच सरकारच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये एकूण ८ हजार लोक दाखल करून घेण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. ही परिस्थिती पाहता ज्या लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे, अशा लोकांनी घराबाहेर पडू नये असे त्यांना सांगण्यात आल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.

करोना Live: देशभरात करोनाचे ५२६ रुग्ण

आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र सर्व संशयित कोरोनाव्हायरस रूग्णांवर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री, डॉ. हर्षवर्धन. या बरोबरच देशातील १ लाख ८७ हजारांहून अधिक लोकांवर देखरेख ठेवली जात असल्याचेही ते म्हणाले. आरोग्यमंत्री पुढे कळकळीने म्हणाले की, आम्ही सर्व संशयितांवर नजर ठेवून आहोत, पण लोकांना त्यांच्या घरात रहावे असे आवाहन आम्ही करतो.

करोना: पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार

करोनाशी लढा देणयासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. अनेक राज्यांनी आपल्या राज्यात लॉकडाऊन किंवा संचारबंदी लागू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशातील नागरिकांना उद्देशून भाषण करणार आहेत. करोनाशी संबंधित महत्त्वाची माहिती आपण लोकांना सांगू असे ट्विटद्वारे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले आहे. जवळजवळ संपूर्ण देश बंद झाला असून देशभरातील ५४८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

शाहीन बाग: पोलिसांनी 'असे' हटवले तंबू

लॉकडाऊन किंवा संचारबंदी असतानाही जे बेजबाबदारपणे वागत आहेत, अशांविरोधात पोलिस कारवाई देखील करत आहेत. दरम्यान येत्या २६ मार्चला होणाऱ्या राज्यसभेच्या १८ जागांसाठीची निवडणूकही पुढे ढकलण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज