अ‍ॅपशहर

सुटले! कनिकाला भेटलेल्या ४५ जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह

कनिका कपूरने परदेशातून आल्यानंतर अनेक पार्ट्यांना हजेरी लावली होती. या पार्ट्यांमध्ये अनेक दिग्गज नेते तिच्या संपर्कात आले. उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह यांचाही या ४५ जणांमध्ये समावेश आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे चिरंजीव खासदार दुष्यंत सिंह यांचीही पार्टीला उपस्थिती होती. त्यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Mar 2020, 2:13 pm
लखनौ : उत्तर प्रदेशातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. करोनाबाधित गायिका कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या ४५ जणांचा रिपोर्ट निगेटीव्ह आलाय. यामध्ये योगी सरकारमधील काही मंत्र्यांचाही समावेश आहे. कनिका कपूरने परदेशातून आल्यानंतर अनेक पार्ट्यांना हजेरी लावली होती. या पार्ट्यांमध्ये अनेक दिग्गज नेते तिच्या संपर्कात आले. या नेत्यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवलं आहे. करोना चाचणी झालेल्या ४५ जणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kanika


कनिका कपूरची अडचण वाढली; लखनऊमध्ये गुन्हा दाखल

उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह यांचाही या ४५ जणांमध्ये समावेश आहे. कनिका कपूर ज्या पार्टीला गेली तिथे १०० पेक्षा जास्त अधिकारी, नेते आणि सेलिब्रिटी उपस्थित होते. कनिकाने परदेशातून आल्याची माहिती लपवल्याबद्दल तिच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे चिरंजीव खासदार दुष्यंत सिंह यांचीही पार्टीला उपस्थिती होती. त्यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवलं आहे.

Coronavirus: दुष्यंत-कनिका भेट; संसदेचे अधिवेशन स्थगित करण्याची

वसुंधरा राजे विलगीकरणात

वसुंधरा राजे यांनी मुलासह पार्टीला हजेरी लावली होती. दुष्यंत सिंह हे संसदेत असल्याची माहिती आहे, तर वसुंधरा राजे यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवलं आहे. करोना व्हायरस एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत अत्यंत वेगाने पसरतो. त्यामुळे कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची धाकधूक वाढली आहे. कनिका कपूर १५ मार्च रोजी एका पार्टीत सहभागी झाली होती. बसपा नेते अकबर डंपी यांनी ही पार्टी आयोजित केली असल्याची माहिती आहे. त्यांनी एक पार्टी आपल्या घरी आणि दुसरी पार्टी ताज हॉटेलमध्ये दिली होती.

करोनाः कनिका कपूरला हॉस्पिटलमध्ये मिळाली डॉक्टरांकडून धमकी?

कनिका कपूरवर गुन्हा दाखल

कनिका कपूर हिच्या विरोधात लखनऊमधील सरोजिनी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगभर करोना विषाणूचा संसर्ग पसरल्याच्या पार्श्वभूमीवर लंडनहून आलेली असतानाही कनिकाने पार्टीचे आयोजन करत संवेदनशील विषयाची माहिती लपवून बेजबाबदारपणा दाखवला असा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आहे. या पार्टीत राजकीय नेते आणि मोठे अधिकारी सहभागी झाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज