अ‍ॅपशहर

शर्जील इमामला पाच दिवसांची कोठडी

भारतविरोधी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या जेएनयू विद्यार्थी शर्जील इमाम याला पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टाने हा निर्णय दिला, क्राइम ब्रान्चला शर्जीलची कस्टडी मिळाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jan 2020, 10:49 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sharjil

भारतविरोधी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या जेएनयू विद्यार्थी शर्जील इमाम याला पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टाने हा निर्णय दिला, क्राइम ब्रान्चला शर्जीलची कस्टडी मिळाली आहे.

शर्जीलला मंगळवारी जहानाबाद येथून अटक करण्यात आली होती. शर्जीलने दावा केला होता की तो शरण आला होता, मात्र पोलिसांना हा दावा फेटाळला होता. दिल्ली पोलिसांना मंगळवारी त्याची ट्रान्झिट रिमांड मिळाली होती.

CAA: आंदोलकांवर महिलेने मिरची पूड फेकली

आधी अशी चर्चा होती की शर्जीलला पतियाळा हाऊस कोर्टात न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे तेथे वातावरण तणावग्रस्त बनले होते. या दरम्यानच काही वकिलांनी शर्जील याच्याविरोधात घोषणाही दिल्या. त्यांच्या हातात पोस्टरही दिसत होते. त्यावर शर्जीलला 'देशद्रोही' असं संबोधण्यात आलं होतं. वकिलांनी त्याला फाशी देण्याचीही मागणी केली. कोर्टाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

CAA: पाकिस्तान शत्रू राष्ट्र नाही - तपन बोस

एका वकिलाने सांगितलं, 'जो देश तोडण्याची भाषा करेल, त्याविरोधात आम्ही येथे निदर्शने करणार, सर्व वकील अशा देशद्रोहींच्या विरोधात एकजुटीने उभे आहेत. त्याला तुरुंगाबाहेर राहण्याचा हक्क नाही. त्याच्यावर कठोर कारवाई करायला हवी.'

कोण आहे शर्जील इमाम?... वाचा

काय म्हणाला होता शर्जील?

उत्तर प्रदेश, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि दिल्लीमधील पोलिसांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये शर्जीलला अटक करायची होती. पोलिसांनी त्याच्या गावात रविवारी छापाही टाकला होता. शर्जीलच्या भावालाही अटक करण्यात आली होती. आयआयटी मुंबई येथून कम्प्युटर सायन्समधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर शर्जीलने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये 'सेंटर फॉर हिस्टॉरिकल स्टडीज'मध्ये संशोधनासाठी प्रवेश घेतला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शर्जील याने आसाम भारतापासून वेगळा करण्याची भाषा केली होती. 'पाच लाख लोक एकत्रित आले, तर ईशान्य भारताला भारतापासून कायमस्वरूपी आपण तोडू शकू. कायमस्वरूपी नाही, तर किमान महिना किंवा पंधरा दिवस तरी तोडू शकू. रेल्वे रूळांवर इतकी घाण करा, की हवाई दलाला ती साफ करण्यासाठी एक महिना लागेल. आसामला तोडण्याची जबाबदारी आपली आहे. असे केले, तरच सरकार आपले म्हणणे ऐकेल. आसाममधील मुस्लिमांची स्थिती काय आहे, हे आपल्याला माहीत आहे. त्यांना 'डिटेंशन सेंटर'मध्ये ठेवण्यात येत आहे,' असे विधान शर्जील याने केले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज