अ‍ॅपशहर

६० वर्षांच्या पतीने केली पत्नीची संशयातून हत्या

येथील आनंद निकेतन भागात एका ६० वर्षाच्या वृद्धाने अतिशय क्रूरपणे आपल्या पत्नीची हत्या केली. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. ही महिला दिल्लीच्या महिला आयोगाची माजी समुपदेशक होती आणि सध्या एका बुटीकमध्ये काम करत होती.

Maharashtra Times 27 Oct 2016, 10:31 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 60 year old stabs wife in car in anand niketan
६० वर्षांच्या पतीने केली पत्नीची संशयातून हत्या


येथील आनंद निकेतन भागात एका ६० वर्षाच्या वृद्धाने अतिशय क्रूरपणे आपल्या पत्नीची हत्या केली. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. ही महिला दिल्लीच्या महिला आयोगाची माजी समुपदेशक होती आणि सध्या एका बुटीकमध्ये काम करत होती.

मुकेश मोंगा असे या वृद्धाचे नाव आहे. पत्नीला बुटीकमध्ये सोडायला तो आला होता. तो दारुच्या नशेत गाडी चालवत होता. सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, मुकेशने कार पार्क केली आणि पत्नी मंजुसोबत त्याची बाचाबाची झाली. मंजुला कारमधून उतरायला जास्त वेळ लागत असल्याचे सुरक्षा रक्षकाच्या ध्यानात आले. तो कारजवळ आला, तोपर्यंत मुकेशने मंजुला धक्काबुक्की करायला सुरुवात केली होती, तिचे केस ओढत होता. सुरक्षा रक्षक मध्ये पडू लागताच मुकेशने गाडी सुरू केली आणि पुढे जाऊ लागला. त्याने चाकू काढला आणि मंजुवर सपासप वार केले.

मंजुवर मुकेशने ९ वार केले. तिचा गळा चिरला, छातीवर वार केले आणि डोळ्यातही चाकू घुसवला. गाडी वेगात पुढे गेल्याने सुरक्षा रक्षकाने पोलिसांना कळवले. पोलिसांनी गाडी अडवून मुकेशला अटक केली. जखमी मंजूला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले.

मुकेश मोंगाने पोलिसांना दिलेल्या जबानीनुसार, मंजुला क्लायंट्सचे फोन यायचे, त्यावरून तो संशय घेत होता. त्याला दिलेल्या पैशांच्या खर्चाचा हिशेबही मंजु मागायची. मुकेशवर कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज