अ‍ॅपशहर

मॉब लिंचिंग: ४९ दिग्गजांच्या पत्राला ६१ प्रतिभावंतांचे प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील झुंडबळीच्या घटना रोखण्यासाठी विविध क्षेत्रातील ४९ दिग्गज व्यक्तींनी पत्र लिहून चिंता व्यक्त केल्यानंतर त्याच्या उत्तरादाखल देशभरातील ६१ सेलिब्रिटींनी खुले पत्र प्रसिद्ध केले आहे. झुंडबळीविरोधात ४९ दिग्गजांनी लिहिलेले पत्र हे 'सिलेक्टिव्ह आउटरेज' आणि 'फॉल्स नॅरेटीव्ह्ज'चा (खोटे कथन) प्रयत्न करणारे असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jul 2019, 1:31 pm
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील झुंडबळीच्या घटना रोखण्यासाठी विविध क्षेत्रातील ४९ दिग्गज व्यक्तींनी पत्र लिहून चिंता व्यक्त केल्यानंतर आता देशात पत्रयुद्धच सुरू झाले आहे. या ४९ दिग्गजांच्या पत्राला उत्तर देत देशभरातील ६१ सेलिब्रिटींनी खुले पत्रच प्रसिद्ध केले आहे. झुंडबळीविरोधात ४९ दिग्गजांनी लिहिलेले पत्र हे 'सिलेक्टिव्ह आउटरेज' आणि 'फॉल्स नॅरेटीव्ह्ज'चा (खोटे कथन) प्रयत्न करणारे असल्याचे ६१ प्रतिभावंतांच्या खुल्या पत्रात म्हटले आहे. हे खुले पत्र लिहिणाऱ्या प्रतिभावंतांमध्ये अभिनेत्री कंगना रनौट, लेखक प्रसून जोशी, शास्त्रीय नृत्यांगना आणि खासदार सोनल मानसिंह, वादक पंडित विश्वमोहन भट्ट, चित्रपट निर्माता मधुर भांडारकर आणि विवेक अग्निहोत्री यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम open-letter-to-pm-modi-maha


या खुल्या पत्रात पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या ४९ दिग्गजांना 'स्वयंघोषित रक्षक; असा टोलाही हाणला आहे. या ४९ दिग्गजांचा उद्देश निव्वळ राजकीय असल्याचेही या प्रतिभावंतांनी खुल्या पत्रात म्हटले आहे. नक्षलवादी हल्ल्यात जेव्हा आदिवासी आणि गरिब मारले जातात, तेव्हा हे सर्व गप्प असतात असेही या प्रतिभावंतांनी खुल्या पत्रात नमूद केले आहे.


'तेव्हा कुठे होते हे दिग्गज?'

काश्मीरमध्ये फुटिरतावाद्यांनी शाळा बंद केल्या तेव्हा हे लोक कुठे होते?, जेएनयूमध्ये घोषणाबाजी होत होती तेव्हा हे कुठे होते?, देशाचे तुकडे तुकडे करण्याच्या घोषणा देण्यात आल्या, तेव्हा या लोकांनी आपले विचार का नाही व्यक्त केले?.... असे एकापेक्षा एक प्रश्न या खुल्या पत्रात विचारण्यात आले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज