अ‍ॅपशहर

७० वर्षीय आजोबा देताहेत दहावीची परीक्षा

'कोणतीही गोष्ट शिकण्याचं काही वयं नसतं' असं म्हणतात आणि हेच विधान सार्थ ठरवलं आहे गुजरातच्या जुनागडमधील ७० वर्षीय पर्वत मकवाना यांनी. तब्बल ५५ वर्षांनंतर मकवानांनी पुन्हा पुस्तक हाती धरलं असून ते यंदा ज्ञानभारती विद्यापीठातून दहावीची परीक्षा देत आहेत.

Harita Dave | Maharashtra Times 21 Mar 2017, 2:00 pm
अहमदाबाद मिरर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 70 year old appears for class 10 examination
७० वर्षीय आजोबा देताहेत दहावीची परीक्षा


'कोणतीही गोष्ट शिकण्याचं काही वयं नसतं' असं म्हणतात आणि हेच विधान सार्थ ठरवलं आहे गुजरातच्या जुनागडमधील ७० वर्षीय पर्वत मकवाना यांनी. तब्बल ५५ वर्षांनंतर मकवानांनी पुन्हा पुस्तक हाती धरलं असून ते यंदा ज्ञानभारती विद्यापीठातून दहावीची परीक्षा देत आहेत.

जुनागड जिल्ह्याचे काँग्रेस उपाध्यक्ष असलेले मकवाना हे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवतात. जमेल तेवढं शिक्षण घेऊन त्याच्या माध्यमातून गावकऱ्यांची सेवा करता यावी, हे त्यांचे ध्येय आहे. 'गेल्या काही वर्षांमध्ये अभ्यासक्रमात अमूलाग्र बदल झाला आहे. इतक्या वर्षांनी पुन्हा अभ्यास सुरू करणंही सोपं नव्हतं. पण कुटुंबीयांसमोर ताठ मानेने उभं राहण्यातही एक वेगळाच आनंद आहे,' असे मकवाना यांनी सांगितले. त्यांच्या या निर्णयाला पाठबळ देणारी, त्यांना प्रोत्साहित करणारी व्यक्ती म्हणजे त्यांची १०१ वर्षीय आई. त्या स्वत: अशिक्षित असल्या तरी त्यांच्याकडे सुशिक्षित माणसाच्या तोडीचं ज्ञान व समज आहे. मकवाना यांना तीन मुलं अन् चार मुली असून ते सर्व उच्चशिक्षित आहेत. संस्कृत हा त्यांचा आवडता विषय तर गणित त्यांना बिलकूल आवडत नाही.

'दिवसभर कितीही व्यग्र असलो तरी मी अभ्यासासाठी रोज किमान दोन तास वेळ काढतोच. इतक्या वर्षांनंतर शिकायला सुरुवात करूनही मला कोचिंग क्लासची गरज भासली नाही. माझ्याच वसतिगृहातील मुलांनी मला रात्रभर जागून गणित शिकवलं. त्यांच्या प्रयत्नांचं चीज करायचा माझा प्रयत्न आहे,' असे मकवाना यांनी सांगितले.
लेखकाबद्दल
Harita Dave

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज