अ‍ॅपशहर

Shocking Video: एक-दोन नव्हे तर तब्बल १४ महागड्या गाड्या पाण्यात तरंगल्या, सत्य समोर येताच सगळे हादरले

Shocking Video : महागड्या गाड्यांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेमागे धक्कादायक सत्य समोर आलं आहे. एका जंगलामध्ये सहलीसाठी गेलेल्या काही पर्यटकांसोबत असं काही घडलं की घटना वाचून तुमचाही थरकाप उडेल.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2022, 1:54 pm
Accident Viral Video : जंगलात पावसामुळे अचानक पाणी वाढल्याने किमान १४ गाड्या वाहून गेल्या, तर ५० लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पळ काढला. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जितेंद्र सिंह पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूर जिल्ह्यातील सर्व लोक रविवारी संध्याकाळी बलवारा पोलीस स्टेशन हद्दीतील कटकूट जंगलात सुकरी नदीजवळ सहलीचा आनंद लुटत होते. परिसरात पावसाने ओढ दिल्याने नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम viral video today


अचानक आलेल्या पावसाने १४ वाहनं वाहिली...
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहलीसाठी गेलेली मंडळी आपला जीव वाचवण्यासाठी गाड्यांना जागेवरच सोडून जंगलात पळ काढला. यामध्ये तब्बल १४ गाड्यांचा समावेश होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने १० गाड्यांना बाहेर काढलं.



'तू चालू बाई आहे...' म्हणताच विवाहितेनं बॉयफ्रेंडची केली निर्घृण हत्या, अशी सापडली पोलिसांना
पोलिसांनी ट्रॅक्टरच्या मदतीने काढल्या गाड्या...पाण्याच्या प्रवाहात बऱ्याच गाड्या वाहून गेल्या तर एक पुलाच्या खांबाजवळ अडकली. या अधिकाऱ्याने सांगितले की, स्थानिक पोलिसांना अशा ठिकाणी अचानक पाणी वाढण्याच्या धोक्याची माहिती देणारे फलक लावण्यास सांगितले आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख