अ‍ॅपशहर

तिळ्या मुलींची नावे ठेवली 'GST' वरून!

मोदी सरकारच्या कार्यकाळात लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कर (गुड्स अँड सर्व्हिसेस् टॅक्स) अर्थात GST मुळे लोक किती प्रभावित असावेत? सूरतमधील एका महिलेने आपल्या तिन्ही नवजात मुलींची नावेच GST या आद्याक्षरांवरून ठेवली आहेत. तिच्या मुलींची नावे आहेत - गारवी, सांची आणि तारवी!

Maharashtra Times 11 Sep 2017, 12:44 pm
मटा ऑनलाइन वृत्त । सूरत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम a family names their three new born daughters after initials of gst
तिळ्या मुलींची नावे ठेवली 'GST' वरून!

मोदी सरकारच्या कार्यकाळात लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कर (गुड्स अँड सर्व्हिसेस् टॅक्स) अर्थात GST मुळे लोक किती प्रभावित असावेत? सूरतमधील एका महिलेने आपल्या तिन्ही नवजात मुलींची नावेच GST या आद्याक्षरांवरून ठेवली आहेत. तिच्या मुलींची नावे आहेत - गारवी, सांची आणि तारवी!

सूरतच्या कंचन पटेल यांनी तिळ्या मुलींना जन्म दिला. त्या म्हणतात, 'पंतप्रधान मोदी यांच्या एक देश एक टॅक्स - जीएसटी योजनेने आम्ही खूप प्रभावित आहोत. म्हणून तिघींची नावे अशी ठेवली की त्यांची आद्याक्षरे जी, एस आणि टी अशी येतील.'

असं पहिल्यांदाच झालेलं नाही. यापूर्वी १ जुलैला राजस्थानमध्ये जन्माला आलेल्या मुलीचं नाव 'जीएसटी' ठेवण्यात आलं होतं. छत्तीसगडच्या वैकुंठपूरमध्येही १ जुलैला जन्माला आलेल्या मुलीचं नाव जीएसटी ठेवलं होतं. याच दिवशी मध्यरात्री देशभरात जीएसटी लागू झाला होता. Gujarat: A family in Surat names their three new born daughters after initials of Goods & Services Tax, call them Garavi, Sanchi and Taravi pic.twitter.com/gJGyqAHJr6 — ANI (@ANI) September 11, 2017

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज